A person worked for 31 years on fake mark sheet, revealed after retirement. Dainik Gomantak
देश

ऐकावे ते नवलचं! बनावट मार्कशीटवर केली 31 वर्षे नोकरी, निवृत्तीनंतर उघड झाले प्रकरण

Fake Mark Sheet: हा व्यक्ती मुझफ्फरनगरच्या खतौली डेपोमध्ये चालक होता. तो 31 ऑगस्ट 2021 रोजी सेवानिवृत्त झाला. बनावट कागदपत्रांवर त्यांनी नोकरी मिळवली होती. त्याची जन्मतारीख 15 ऑगस्ट 1965 आहे, तर कागदपत्रांमध्ये त्यांनी 15 ऑगस्ट 1961 ही जन्मतारीख दिली आहे.

Ashutosh Masgaunde

A person worked for 31 years on fake mark sheet, revealed after retirement:

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट मार्कशीटच्या आधारे 31 वर्षे काम करत एक व्यक्ती सरकारची फसवणूक करत राहिली.

या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दीपक टंडन नावाच्या व्यक्तीने खतौली शहरातील सुधीर कुमार यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार केली होती.

बनावट मार्कशीटच्या आधारे सुधीरने ३१ वर्षे खतौली आगारात चालक म्हणून सरकारी नोकरी केल्याचे त्यांनी सांगितले होते. 31 ऑगस्ट 2021 रोजी ही व्यक्ती सेवानिवृत्त झाली होती.

या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार खतौली पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८ आणि ४७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराने सांगितले की, बनावट मार्कशीटवर नोकरी मिळवणारा सुधीर कुमार खतौली मध्ये राहतो. तो मूळचा अलवलपूर, भोरकला येथील रहिवासी आहे.

तो मुझफ्फरनगरच्या खतौली डेपोमध्ये चालक होता. 31 ऑगस्ट 2021 रोजी तो सेवानिवृत्त झाला. बनावट कागदपत्रांवर त्याने नोकरी मिळवली होती.

1989 मध्ये या व्यक्तीला नोकरी मिळाली तेव्हा त्याने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी वयोमर्यादेच्या अटी पूर्ण केलेल्या नव्हत्या. त्याची जन्मतारीख 15 ऑगस्ट 1965 आहे, तर कागदपत्रांमध्ये त्याची 15 ऑगस्ट 1961 ही जन्मतारीख दिली आहे.

ते पुढे म्हणाले, जनता इंटर कॉलेज सिसौली येथून मला माहिती अधिकारांतर्गत त्याचे रेकॉर्ड मिळाले आहे. त्याची जन्मतारीख 15 ऑगस्ट 1965 असल्याचे समोर आले.

यासोबतच अलवरपूर माजरा येथील प्राथमिक शाळेतून नोंदी घेण्यात आल्या, त्यातूनही जन्मतारीख १५ ऑगस्ट १९६५ असल्याची पुष्टी करण्यात आली. सरकारला मुर्ख बनवून या व्यक्तीने ३१ वर्षे काम केले. त्याने सरकारची लूट केली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर पोलीस अधिकारी रविशंकर मिश्रा म्हणाले, “माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याची बाब माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आली होती. त्यानंतर याप्रकरणी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT