A minor became a murderer for 50 thousand rupees, the youth was stabbed to death with a knife. Dainik Gomantak
देश

50 हजार रुपयांसाठी अल्पवयीन बनला खुनी, तरुणाची चाकूने भोसकून हत्या

"सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि आरोपीची ओळख पटली आहे. यावरून आरोपी पैसे चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते."

Ashutosh Masgaunde

A minor became a murderer for 50 thousand rupees, the youth was stabbed to death with a knife:

दिल्लीतील वेलकम भागात एका अल्पवयीन मुलाने तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून, त्यामध्ये तो अल्पवयीन मुलगा किती क्रूरपणे चाकूने वार करतोय ते दिसून येत आहे.

खून करणारा आरोपी अल्पवयीन आहे. त्याचे वय 16 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे. या हत्येमागे 50 हजार रुपयांची चोरी असल्याचे बोलले जात आहे.

अल्पवयीन मुलाने प्रथम पीडिताचे तोंड दाबले आणि पीडित बेशुद्ध झाल्यावर त्याने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले आणि सुमारे 50,000 रुपये लुटले.

या हल्ल्यानंतर पीडितेला जीटीबी रुग्णालयात नेण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही स्कॅन केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आणि आरोपी पकडला गेला.

पोलीस उपाधिक्षक जॉय तिर्की म्हणाले, " आम्हाला माहिती मिळाली की, एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले आहेत आणि तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा त्याला मृत घोषित करण्यात आले."

"सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि आरोपीची ओळख पटली आहे. यावरून आरोपी पैसे चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. जेव्हा पीडित तरुणाने विरोध केला तेव्हा त्याने आधी त्याचा गळा दाबून खून केला आणि नंतर चाकूने वार केले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे,” अशी माहिती पोलीस उपाधिक्षक जॉय तिर्की यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंतांनी आपल्याकडे ‘गृहनिर्माण खाते ’ का घेतले? गोमंतकीयांसाठी येणार मोठी योजना

Goa Politics: खरी कुजबुज; दामू नाईक चुकले का?

Chorla Belgaum Road: चोर्लाघाट–बेळगाव रस्ता धोकादायक! खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था; कर्नाटकचे निकृष्ट काम

Russia Ukraine War: 8 जणांचा मृत्यू , 55 जखमी! युक्रेनवर रशियाचे पुन्हा ड्रोनहल्ले; 100 इमारतींचे नुकसान

Goa Politics: 'लोकांसाठी शांतपणे कार्यरत राहणे हे माझे धोरण'! मंत्री कामतांचे प्रतिपादन; खात्यांना न्याय देण्याचे दिले आश्वासन

SCROLL FOR NEXT