Muslim Women Dainik Gomantak
देश

Rajasthan Crime: अल्पवयीन हिंदू मुलगी अचानक मुस्लीम बनून घरी परतली... बलात्कार, धर्मांतराचा वडीलांचा आरोप

Rajasthan Crime: राजस्थानमधील एका व्यक्तीने आपल्या मुलीचे सोहेल खानने अपहरण केल्याचा आरोप केला आहे.

Manish Jadhav

Rajasthan Crime: राजस्थानमधील एका व्यक्तीने आपल्या मुलीचे सोहेल खानने अपहरण केल्याचा आरोप केला आहे. मुलगी घरी परतल्यावर ती स्वतःला मुस्लिम म्हणवू लागली. धक्कादायक म्हणजे ही घटना राजधानी जयपूरमधील आहे.

सोहेल खानने आपल्या मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिला धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा आरोप 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता आरोपीला अटक केली आहे.

त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मानसरोवर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक राकेश मीणा यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शनिवारी या संदर्भात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोहेल खानने काही दिवसांपूर्वी आपल्या 16 वर्षीय मुलीला सवाई माधोपूर येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता.

एसआयने सांगितले की, वडिलांचा आरोप आहे की त्याने जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांची मुलगी परत आली तेव्हा तिने स्वतःला मुस्लिम (Muslim) म्हणायला सुरुवात केली.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, सोहेल खानने या मुलीशी यापूर्वी मैत्री केली होती. जयपूरमध्ये ही मुलगी 20 जून रोजी तिच्या मित्राच्या वाढदिवसाला जात असल्याचे सांगून घरुन निघाली होती, परंतु ती नंतर परतलीच नाही. ही मुलगी 24 जून रोजी घरी परतली होती.

मात्र घरी आल्यानंतर तिने आपले नाव 'इसमायरा खान' सांगण्यास सुरुवात केली आणि हिंदू असण्याचे नाकारले. दुसरीकडे, मुलीची कृती पाहून तिच्या वडिलांनी 1 जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी (Police) एफआयआरमध्ये पॉक्सो कलमही जोडले आहे. 22 वर्षीय सोहेलला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले आणि तेथून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT