A huge increase in the price of Kadkanath chickens has been recorded ahead of the polls for the Madhya Pradesh assembly elections:
सध्या मध्ये प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा ज्वर चढू लागाला आहे, अशात कॉंग्रेस, भाजप किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाची नव्हे तर झाबुआच्या प्रसिद्ध कडकनाथ कोंबडीची चलती आहे.
कारण मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 17 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानापूर्वी कडकनाथ कोंबड्यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली आहे. मध्य प्रदेशात सध्या एका कडकनाथ कोंबडीला सरासरी 1200 ते 1500 रुपये दर मिळत आहे.
काळ्या रंगाच्या पौष्टिक मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या या कोंबडीच्या प्रजातीला भौगोलिक संकेतांचा (GI) दर्जा आहे.
झाबुआच्या कृषी विज्ञान केंद्राचे (KVK) शास्त्रज्ञ डॉ. चंदन कुमार म्हणाले की, थंडीचा हंगाम सुरू झाला असून, निवडणुकाही सुरू आहेत. अशा स्थितीत कडकनाथच्या मागणीत 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ते म्हणाले की, कडकनाथ कोंबडीच्या शुद्ध जातीच्या पिल्लांसाठी देशभरातील पोल्ट्री फार्म चालक झाबुआकडे वळताहेत.
कडकनाथ जातीची शुद्धता जतन करण्याच्या दिशेने काम करणाऱ्या सारा सेवा संस्था समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधांशू शेखर यांनी सांगितले की, त्यांच्या संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या दोन शेतकरी उत्पादक संस्थांच्या पोल्ट्री फार्ममधील निवडणुकीदरम्यान व्यवसाय वाढला आहे.
झाबुआमध्ये भिल्ल आदिवासींची मोठी लोकसंख्या आहे. जिथे चिकन हा आहार आणि अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे.
आदिवासी समाजात देव, देवी आणि पूर्वजांसाठी केल्या जाणाऱ्या विविध विधींमध्ये कोंबडीचा बळी देण्याची प्रथा आहे.
झाबुआ वंशाच्या कडकनाथ कोंबडीला स्थानिक भाषेत ‘कलामासी’ म्हणतात. त्याची त्वचा आणि पिसे ते मांसापर्यंतचा रंग काळा असतो. कडकनाथ प्रजातीचे जिवंत पक्षी, त्याची अंडी आणि त्याचे मांस इतर कोंबडीच्या प्रजातींपेक्षा जास्त दराने विकले जाते.
तज्ज्ञांनी सांगितले की, इतर प्रजातींच्या कोंबड्यांच्या तुलनेत कडकनाथच्या काळ्या रंगाच्या मांसामध्ये फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूपच कमी असते, तर त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण तुलनेने जास्त असते.
देशाच्या भौगोलिक संकेत नोंदणीने 2018 मध्ये मांस उत्पादने आणि कुक्कुट आणि कुक्कुट मांसाच्या श्रेणीमध्ये कडकनाथ कोंबडीच्या नावावर भौगोलिक ओळख (GI Tag) चिन्हाची नोंदणी झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.