Chhattisgarh Dainik Gomantak
देश

पत्नीचा वाढदिवस साजरा करून पत्नी अन् मुलांची चार्जरने गळा आवळून हत्या, स्वत: जीव दिला

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दुर्ग जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील उटाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरपोटी गावात एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या केली आहे. याघटनेबाबत उटाई पोलिसांनी भीती व्यक्त केली आहे. अध्याप प्रकरणाचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमरपोटी येथील जुना साहू मिलपारा येथे राहणारा भोजराज साहू याने पत्नी ललिता साहू आणि 4 वर्षांचा मुलगा प्रवीण कुमार यांचा मोबाईल चार्जरने गळा आवळून खून केला आहे. 2 वर्षाच्या मुलाचा चेहरा उशीने दाबून खून केला आहे. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर भोजराज साहू याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (A heartbreaking news has come out from Durg district in Chhattisgarh)

दोन दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये काही गोष्टीवरून वाद झाल्याचे सांगण्यात आले आहे. बुधवारी पतीने पत्नीचा वाढदिवस देखील साजरा केला. मृत भोजराज हा भिलाई स्टील प्लांटमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता तर 2017 मध्ये त्याचे लग्न झाले होते. त्याच घरात त्याचे आई-वडील आणि भाऊ देखील राहत होते. मात्र, घटनेच्या वेळी घरात अन्य कोणीही उपस्थित नव्हते. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरूच आहे. पलंगावर पत्नी आणि मुलांचा मृतदेह आढळून आला, तर भोजरामचा मृतदेह पोलिसांनी खाली उतरवला.

भोजराम बुधवारी कामावर गेला नव्हता. पत्नीचा वाढदिवस होता पण वाद झाला असे समोर येत आहे. भोजरामने खोलीला आतून कुलूप लावून पत्नी व मोठ्या मुलाचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला असावा, असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. यानंतर त्याने दीड वर्षाच्या चिमुरडीचा उशीने दाबून खून केला. नंतर स्वत: गळफास घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT