Delhi High Court Dainik Gomantak
देश

वयात आलेली मुलगी तिच्या कुटुंबीयांच्या संमतीशिवाय लग्न करु शकते: Delhi HC

Delhi High Court: मुलगी वयात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय मुस्लिम कायद्यानुसार लग्न करु शकते, असे दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Delhi High Court: मुलगी वयात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय मुस्लिम कायद्यानुसार लग्न करु शकते, असे निरिक्षण दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नोंदवले आहे. अशा परिस्थितीत मुलगी अल्पवयीन असली तरी ती पतीसोबत राहू शकते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी मुस्लिम जोडप्याच्या खटल्याची सुनावणी करताना ही टिप्पणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी 11 मार्च रोजी नातेवाइकांच्या इच्छेविरुद्ध दोघांनी लग्न केले. या लग्नात मुलगा 25 वर्षांचा होता, तर कुटुंबीय आणि पोलिसांच्या (Police) म्हणण्यानुसार, लग्नाच्या वेळी मुलगी 15 वर्षांची होती. मात्र, मुलीच्या वकिलाने न्यायालयात सादर केलेल्या आधारकार्डनुसार लग्नाच्या वेळी तिचे वय 19 वर्षे होते.

सरकार खासगी आयुष्यात ढवळाढवळ करु शकत नाही - उच्च न्यायालय

दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) एका आदेशात म्हटले आहे की, "मुस्लिम कायद्यानुसार तारुण्यात आलेली मुलगी तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या संमतीशिवाय लग्न करु शकते हे स्पष्ट आहे. जरी तिचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असले तरी ती लग्न करु शकते. त्याचबरोबर पतीसोबतही राहू शकते.''

दुसरीकडे, न्यायमूर्ती सिंह म्हणाले की, 'जर मुलीने स्वतःच्या इच्छेने लग्न केले आणि ती आनंदी असेल तर सरकार (Government) तिच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करु शकत नाही. आणि विशेष म्हणजे, जोडप्याला वेगळेही करु शकत नाही.'

खरे तर, या जोडप्याने यावर्षी एप्रिलमध्ये न्यायालयाकडे पोलिस संरक्षण मागितले होते. आपल्याला कोणीही वेगळे करणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती. नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोपही मुलीने केला होता. मुलीच्या कुटुंबीयांनी दिल्लीतील द्वारका जिल्ह्यात 5 मार्च रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आयपीसी कलम 376 (बलात्कार) आणि पॉक्सोचे कलम 6 जोडले. त्याचवेळी मुलीने न्यायालयात सांगितले की, 'माझे नातेवाईक मला मारहाण करत होते. आणि जबरदस्तीने त्यांना माझे लग्न दुसऱ्या मुलाशी करायचे होते.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: २५ ऑक्टोबरच्या अखेरीस गोवा वॉटर मेट्रो प्रकल्पाला विशेष मदत करण्याचे आश्वासन

Goa Water Metro: 'वॉटर मेट्रो' सुरू करण्यासाठी मंत्री फळदेसाई केरळ दौऱ्यावर, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनावाल यांची घेणार भेट

Mashel Panchayat: माशेलात उपसरपंच बदलाचा खेळ, की लोकशाहीची थट्टा? राजकीय नाट्य शिगेला; तीन तासांत अविश्‍वास ठराव

Goa Chaturthi Market: डिचोलीच्या बाजारात माटोळीच्या खरेदीसाठी झुंबड, राज्यात गणेशोत्सवाचे वातावरण!

PM Modi Degree Controversy: मोदींची पदवी गुलदस्त्यातच, दिल्ली हायकोर्टाने CIC चा आदेश केला रद्द

SCROLL FOR NEXT