डेहराडूनमधील न्यायालयाने आपल्याच मुलीच्या बलात्काराच्या आरोपातून वडिलांची निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे त्यांना सन्मानाने सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने म्हटले की, 'वडिलांविरुद्ध बलात्काराचा कोणताही पुरावा सापडला नाही. त्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली आहे.' (A girl from Rishikesh in Uttarakhand had accused her father of raping her to save her friend)
दरम्यान, उत्तराखंडमधील ऋषिकेश (Rishikesh) येथील एका मुलीने मित्राला वाचवण्यासाठी वडिलांवर बलात्काराचा आरोप केला होता. वडिलांवर लागलेल्या या कलंकातून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. मुलीने तिच्या वडिलांबद्दल द्वेषाचा आरोप केला आहे, असे न्यायालयाने (Court) म्हटले. विशेष न्यायाधीश मीना देउपा यांच्या खंडपीठाने या मुलीच्या वडिलांना सन्मानपूर्वक मुक्त केले.
तसेच, या प्रकरणी बचाव पक्षाचे वकील आशुतोष गुलाटी यांनी सांगितले की, जुलै 2020 रोजी एका मुलीने ऋषिकेश कोतवालीमध्ये वडिलांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणापूर्वी मुलीवर दोन तरुणांनी बलात्कार केल्याचा गुन्हा वडिलांनी दाखल केला होता. या तरुणांनी आपल्या मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप वडिलांनी केला. यानंतर पोलिसांनी (Police) पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी निरिक्षण नोंदवले. मात्र चौकशीदरम्यान तरुणीने आपल्या वक्तव्यावरुन माघार घेत आरोपी तरुणाला आपला प्रियकर असल्याचे सांगितले. त्याचबरोबर प्रियकराशी लग्न करायचे असल्याचे देखील तिने यावेळी सांगितले. दुसरीकडे मात्र, घरचे लोक यासाठी तयार नाहीत, असं देखील ती यावेळी म्हणाली.
मुलीने वडिलांवर केला बलात्काराचा आरोप
आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं, जेव्हा पीडितेने तिच्या वडिलांवर अनेक महिने बलात्कार केल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी वडिलांना अटक केली. मुलीने सांगितले होते की, 'माझे वडील तरुणांना फसवण्याबाबत बोलत होते.' दुसरीकडे, पोलिसांनी पीडितेच्या वडिलांना बलात्काराचा आरोपी गृहीत धरुन कोर्टात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर खटल्यात सरकारी वकिलांनी सात साक्षीदार हजर केले.
तरुणीने प्रियकराशी लग्न केले होते
न्यायालयीन सुनावणीदरम्यान तरुणीने त्या तरुणाशी लग्न केले असून आता ती पतीसोबत राहत आहे. यादरम्यान वडिलांना अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावं लागलं. तर आता वडिलांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटका करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.