Brij bhushan Sharan Singh

 

Dainik Gomantak 

देश

भाजप खासदाराला आला राग...!

झारखंडची (Jharkhand) राजधानी रांचीमध्ये एका राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेदरम्यान एका भाजप खासदाराने कुस्तीपटूला थप्पड मारताना कॅमेऱ्यात कैद केले.

दैनिक गोमन्तक

झारखंडची (Jharkhand) राजधानी रांचीमध्ये एका राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेदरम्यान एका भाजप खासदाराने कुस्तीपटूला थप्पड मारताना कॅमेऱ्यात कैद केले. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) या कुस्तीपटूला दोनदा थप्पड मारताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. याच्या निषेधार्थ बाकीच्या पैलवानांनी गोंधळ घातला.

दरम्यान, रांचीमधील (Ranchi) शहीद गणपत राय इनडोअर स्टेडियमवर 15 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे खासदार सिंह प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला पोहोचले होते.

शिवाय, वृद्धापकाळामुळे या कुस्तीपटूला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी नव्हती, असे सांगण्यात येत आहे. त्याला तांत्रिक कारणावरुन अपात्र ठरवण्यात आले. त्या कुस्तीपटूने प्रथम स्पर्धेच्या टेक्नीकल टीमसमोर आक्षेप नोंदवला. त्यांचा आक्षेप फेटाळल्यानंतर त्यांनी मंचावर पोहोचून भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, त्यांनी 15 वर्षांखालील स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी द्यावी यासाठी भाजप खासदाराकडे आग्रह धरला. यानंतर खासदाराने थप्पड मारली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Latest Updates: जाणून घ्या गोव्यातील घडामोडी; राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि महत्वाच्या बातम्या

Luthra Brothers: लुथरांवरील सदोष मनुष्यवधाचे ‘105कलम’ चुकीचे! वकिलांचा दावा; काय केले युक्तिवाद? वाचा..

Lokotsav 2026: रौप्यमहोत्सवी लोकोत्सवाबाबत मोठी अपडेट! महोत्सवासाठी तिकीट आकारण्याचा विचार; मंत्री तवडकरांचे सूतोवाच

Shadab Jakati: गोव्याचा फिरकी गोलंदाज खेळणार T20, दीर्घ काळानंतर पुनरागमन; इंग्लंडच्या माजी कर्णधारासोबत दिसणार मैदानात

Goa Accident: गोव्यात रस्त्यांवरून चालणे ठरत आहे धोकादायक? 57 पादचाऱ्यांचा अपघाती मृत्‍यू; रस्‍ता सुरक्षेबद्दल जागृतीची मागणी

SCROLL FOR NEXT