Children Dainik Gomantak
देश

Lucknow: वाढदिवसाच्या पार्टीत जेवण करणं पडलं महागात, 90 जणांची प्रकृती बिघडली

Lucknow: लखनौमधील गौरा गावात वाढदिवसाच्या पार्टीत जेवण केल्याने 90 हून अधिक लोक आजारी पडले.

दैनिक गोमन्तक

Lucknow: लखनौमधील गौरा गावात वाढदिवसाच्या पार्टीत जेवण केल्याने 90 हून अधिक लोक आजारी पडले. उलट्या आणि जुलाबाच्या विळख्यात ते सापडले. लोकांची प्रकृती बिघडू लागली. यामध्ये बहुतांश मुलांचा समावेश आहे. घाईघाईत सोमवारी रात्रीपासून गंभीर अवस्थेत रुग्णांना रुग्णालयात नेण्याची प्रक्रिया सुरु झाली. जी मंगळवारीही कायम राहीली. रात्री उशिरापर्यंत 52 रुग्ण दाखल झाले आहेत. खासगी रुग्णालयात दहाहून अधिक रुग्ण दाखल आहेत. स्थानिकांनीही पाण्याचा त्रास होण्याची भीती व्यक्त केली आहे.

वाढदिवसाच्या पार्टीत जेवण खाल्ल्यानंतर तब्येत बिघडली

गौरा येथे सोमवारी सनी रावत यांच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये शेजारी आणि काही नातेवाईकांना बोलावण्यात आले होते. जेवणात चणे आणि पुरीसह इतर पदार्थ होते. जेवण झाल्यानंतर रात्री उशिरा अनेकांना पोटदुखीसह उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. अनेकांनी खासगी रुग्णालय (Hospital) गाठून औषधे घेतली.

तसेच, काही वेळातच मोठ्या प्रमाणात लोक उलट्या आणि जुलाबाच्या विळख्यात येऊ लागले. स्थानिक सामुदायिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. डॉक्टरांचे (Doctor) पथक गावात पोहोचले. अनेकांची अवस्था पाहून रुग्णवाहिका आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सर्व आजारी लोकांना मोहनलालगंज सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले.

मुलाच्या आई आणि वडिलांची प्रकृतीही बिघडली

वाढदिवस असलेल्या मुलाचे संपूर्ण कुटुंब आजाराच्या विळख्यात सापडले आहे. ज्या मुलाचा वाढदिवस झाला, त्याचे वडील सनी, आई नेहा आणि बाबा जगन्नाथ यांचीही प्रकृती खालावली. त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Olive Ridley: गालजीबाग किनाऱ्यावर 'रिडले'ची 109 अंडी, केंद्रात उबवण्यासाठी लागणार 48 ते 58 दिवस

सरकारी कार्यालयांत शुकशुकाट, वास्कोत परिणाम; वर्षअखेर बहुतांश कर्मचारी रजेवर

Arpora Nightclub Fire: हडफडेतील क्लब संरचना मूलतःच बेकायदेशीर, व्यापार परवाना नाही हे माहित होते; पंचायत सचिवाची जबानी

2026 New Rules: गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून लागू झाले 'हे' 8 नवे नियम! सामान्यांच्या खिशाला कात्री

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नववर्षाची मोठी भेट; 8 व्या वेतन आयोगाच्या कामाला अधिकृत सुरुवात, पगार 35 टक्क्यांनी वाढणार?

SCROLL FOR NEXT