Biparjoy Cyclone Video Dainik Gomantak
देश

Biparjoy Video: गुजरात, महाराष्ट्रासह 9 राज्यांना बिपरजॉयचा फटका; गुजरातमध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पडझड

गुजरातमधील द्वारका येथे आलेल्या वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक होर्डिंग्ज पडले आहेत.

Pramod Yadav

Biparjoy Cyclone: बिपरजॉय चक्रीवादळ कच्छमध्ये धडकण्यास सुरुवात झाली आहे. चक्रीवादळामुळे 115-125 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. सध्या सौराष्ट्रात सर्वच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मध्यरात्रीपर्यंत लँडफॉल सुरू राहील. यानंतर वादळ कमकुवत होऊन राजस्थानकडे वळेल.

मात्र, त्यापूर्वीच कच्छ, जामनगर आणि द्वारकामध्ये जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांब आणि झाडे पडल्याची माहिती समोर आली आहे. या भागातील वीजही खंडित झाली आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाच्या धोक्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार सर्वजण सतर्क आहेत. NDRF च्या 17 टीम आणि SDRF च्या 12 टीम गुजरात मध्ये तैनात केल्या आहेत. त्याचबरोबर नौदलाची 4 जहाजे सध्या स्टँडबायमध्ये ठेवण्यात आली आहेत.

किनाऱ्यालगत राहणाऱ्या 74,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि महाराष्ट्रासह 9 राज्यांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. यामध्ये लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि राजस्थान (पश्चिम) ही 9 राज्ये आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभावामुळे मोरबीमध्येही जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. सध्या बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव संपूर्ण सौराष्ट्रात दिसून येत आहे. द्वारका आणि जामनगर येथून मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि झाडे पडल्याचे वृत्त आहे.

गुजरातमधील द्वारका येथे आलेल्या वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक होर्डिंग्ज पडले आहेत. बिपरजॉयमुळे जिल्ह्यात जोरदार वारे वाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IndiGo Share Market Loss: विमानं रद्द करणं इंडिगोला पडलं महागात! एका दिवसात तब्बल 7160 कोटींचा फटका, बाजारमूल्यात मोठी घसरण

Goa Politics: 'त्या 11 जागांवर युतीची चर्चाच नव्हती', अमित पाटकरांचा 'धक्कादायक' खुलासा! काँग्रेस आणि आरजीपीमध्ये विस्फोट?

Rohit Sharma: टी-20 क्रिकेटमध्ये 'हिटमॅन'ची एन्ट्री, लवकरच मैदानात उतरणार? जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने

VIDEO: अमेरिकेचे थंडरबर्ड्स लढाऊ जेट कॅलिफोर्नियात कोसळले; प्रशिक्षणादरम्यान भीषण अपघात, पायलट थोडक्यात बचावला!

AUS vs ENG: मिचेल स्टार्कचा ऐतिहासिक रेकॉर्ड! वसीम अक्रमला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये ठरला जगातील नंबर-1 डावखुरा वेगवान गोलंदाज VIDEO

SCROLL FOR NEXT