old lady Dainik Gomantak
देश

Gujarat: पतीच्या वाढत्या सेक्स डिमांडला कंटाळून वृध्द महिलेने केली पोलिसांत तक्रार

Gujarat News: गुजरातमधील वडोदरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Gujarat News: गुजरातमधील वडोदरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका 87 वर्षीय वृद्ध महिलेने पतीविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. पतीच्या सेक्स डिमांडमुळे त्या नाराज असल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले. महिलांच्या मदतीसाठी उभारलेल्या '181 अभ्यम' या हेल्पलाइनवर फोन करुन या वृध्द महिलेने मदत मागितली.

वृत्तानुसार, अभ्यम अधिकारी म्हणाले, "89 वर्षीय पती लैंगिक संबंधासाठी वारंवार मागणी करत होता, जो आजारीही होता. पत्नी आपली डिमांड पूर्ण करत नसल्याची त्याची तक्रार होती.''

अधिकाऱ्याने पुढे असेही सांगितले की, 'या वृध्द जोडप्यांमध्ये चांगले संबंध होते, परंतु आजारी पडल्यानंतर वृध्द पत्नी अंथरुणाला खिळून होती. या वृध्द महिलेला आता सून आणि मुलाच्या मदतीशिवाय चालताही येत नाही. वृध्द पतीला पत्नीच्या स्थितीची जाणीव होती, परंतु तरीही त्यांच्याकडून सेक्सची मागणी वारंवार केली जात होती. नकार दिल्यावर ते ओरडायचे आणि भांडायचे सुध्दा. वृध्द पती एवढ्या जोरात ओरडायचा की शेजाऱ्यांनाही ते कळायचे.'

दुसरीकडे, वैतागलेल्या वृद्ध महिलेने पोलिसांची (Police) मदत घेण्याचे ठरवले आणि हेल्पलाइनवर फोन करुन आपली करुण कहाणी सांगितली. त्यानंतर तात्काळ अभ्यमच्या पथकाने त्यांच्या घरी पोहोचून वृद्धांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अधिका-यांनी वृद्ध व्यक्तीला योगा करण्याचा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या क्लबमध्ये सामील होण्याचा सल्ला दिला, जेणेकरुन त्यांचे लक्ष सेक्सपासून वळवता येईल. वृद्धांना डॉक्टरांकडे (Doctor) न्यावे, असे कुटुंबीयांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT