6 Pakistanis Caught Off The Coast Of Gujarat Dainik Gomantak
देश

गुजरातच्या किनारपट्टीवर 6 पाकिस्तानी पकडले, 480 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; मोठा कट उधळला

6 Pakistanis Caught Off The Coast Of Gujarat: गुजरातच्या किनारपट्टीवर सर्च आपरेशनदरम्यान 6 पाकिस्तानी पकडण्यात आले आहेत.

Manish Jadhav

6 Pakistanis Caught Off The Coast Of Gujarat:

गुजरातच्या किनारपट्टीवर सर्च आपरेशनदरम्यान 6 पाकिस्तानी पकडण्यात आले आहेत. गुजरात एटीएस, भारतीय तटरक्षक दल आणि एनसीबीच्या संयुक्त कारवाईत या 6 पाकिस्तानींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून 480 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या पकडलेल्या पाकिस्तानींना पोरबंदरला आणण्यात येणार आहे. तटरक्षक दल, एटीएस आणि एनसीबीने मिळून आतापर्यंत 3,135 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 11-12 मार्चच्या रात्री भारतीय तटरक्षक दल, एनसीबी (NCB) आणि एटीएसने केलेल्या संयुक्त कारवाईत भारतीय तटरक्षक दलाने (ICG) गुप्तचर माहितीच्या आधारे एक पाकिस्तानी बोट पकडली. बोटीवर 6 क्रू मेंबर्स होते. त्यांच्याकडून सुमारे 480 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. संयुक्त कारवाईत पोरबंदरपासून सुमारे 350 किमी अंतरावर अरबी समुद्रात पाकिस्तानी बोट अडवण्यात आली. कारवाईत ICG, NCB आणि ATS गुजरात यांच्यातील उत्तम समन्वयामुळे ही बोट पकडता आली.

गुप्तचर माहितीच्या आधारे कारवाई केली

दरम्यान, भारतीय सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या विशिष्ट गुप्तचर माहितीनंतर रणनीती आखून ही कारवाई करण्यात आली. या अंतर्गत अरबी समुद्रात जहाजे तैनात करण्यात आली. ICG ने त्यांच्या डॉर्नियर विमानाला संभाव्य भागात बोट स्कॅन करुन शोधण्याचे कामही दिले होते. परिसरात कसून शोध घेतल्यानंतर, NCB आणि ATS गुजरातच्या पथकांसह ICG चे जहाज पोहोचले जिथे अंधारात संशयास्पदरित्या बोट फिरत असलेली दिसून आली.

तपासात 80 किलो ड्रग्ज जप्त

दुसरीकडे, ICG जहाजांनी आव्हान दिल्यावर बोट आपला मार्ग बदलू लागली. त्यानंतर ICG जहाजांनी युक्तीने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना थांबवण्यास भाग पाडले. बोर्डिंग टीम ताबडतोब प्राथमिक तपासणीसाठी जहाजावर चढली. तिथे पाहिले असता 6 क्रू मेंबर्स उपस्थित होते. जॉइंट बोर्डिंग टीमने केलेल्या तपासणीदरम्यान 480 कोटी रुपयांचे अंदाजे 80 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले.

दरम्यान, बोटीसह कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासासाठी पोरबंदर येथे आणण्यात येत आहे. ICG ने ATS गुजरात आणि NCB सोबत गेल्या तीन वर्षात केलेली ही 10वी मोठी कारवाई केली आहे. यामध्ये एकूण 3135 कोटी रुपयांचे 517 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT