Hijab Dainik Gomantak
देश

कर्नाटकात 58 विद्यार्थिनींना हिजाबमुळे केलं निलंबित?

शिवमोग्गाचे उपायुक्त आर सेल्वामणी यांनी या वृत्ताची घेतली दखल

दैनिक गोमन्तक

कर्नाटक: कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादाला शनिवारी वेगळे वळण मिळाले, राज्यातील 58 मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याचा आग्रह धरल्याबद्दल शाळेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र, आता शिवमोग्गाचे उपायुक्त आर सेल्वामणी यांनी या वृत्ताची दखल घेतली आहे. (58 girl students suspended for hijab in karnataka)

नुकत्याच हाती अलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी शिवमोग्गा जिल्ह्यातील कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये हिजाबवर बंदी आणल्याच्या निषेधार्थ 58 विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आले आहे. विद्यार्थिनींनी त्यांना वर्गात हिजाब घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. हिजाब हा आमचा हक्क आहे, आम्ही मरणार पण हिजाब सोडणार नाही, अशी त्यांनी भुमिका दाखवली

शिवमोग्गा उपायुक्त आर सेल्वामणी यांनी दिलेल्या माहिती नूसार, विद्यार्थिनींच्या निलंबनाचा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. ते पुढे म्हणाले "निलंबनाचा आदेश कुठे आहे, मला पाहावा लागेल. मी तो पाहिला नाही"

काय आहे विद्यार्थिनींच्या निलंबनाचा मुद्दा ?

खरं तर, कर्नाटकच्या (Karnataka) अनेक भागांमध्ये शनिवारी मुली त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब (Hijab) घालून आल्या होत्या, परंतु न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत त्यांना प्रवेश दिला गेला नाही. शिरलाकोप्पा, शिवमोग्गा येथे शुक्रवारी, प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज प्रशासनाच्या विरोधात आणि हिजाब काढण्यास नकार दिल्याबद्दल 58 विद्यार्थिनींना निलंबित केल्याचे वृत्त समोर आले आहे. मुख्याध्यापकांनी आम्हाला निलंबित केल्याची माहिती मुलींनी दिली.

एका विद्यार्थिनीने (Student) पत्रकारांना सांगितले की, निलंबित विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये न येण्यास सांगण्यात आले आहे. शनिवारीही मुली हिजाब परिधान करण्याच्या समर्थनार्थ घोषणा देत कॉलेजमध्ये आल्या. मात्र त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. विद्यार्थिनींनी सांगितले की, "आम्ही इथे पोहोचलो पण मुख्याध्यापकांनी सांगितले की आम्हाला निलंबित करण्यात आले आहे आणि आम्हाला कॉलेजमध्ये येण्याची गरज नाही. पोलिसांनी देखील आम्हाला कॉलेजमध्ये न येण्यास सांगितले होते, तरीही आम्ही आलो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT