Fake Doctor Arrested In Odisha Dainik Gomantak
देश

54 वर्षीय 'बनावट' डॉक्टरने केले 17 महिलांशी लग्न; ओडिशा पोलिसांची कारवाई

व्यक्तीचा पर्दाफाश झाला आहे ज्याने पैशासाठी एक, दोन नाही तर विविध राज्यात तब्बल 17 महिलांशी लग्न केले. त्या महिलांची फसवणूक करून तो व्यक्ती फरार व्हायचा.

दैनिक गोमन्तक

बरेचदा लोक जास्त पैसे मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गावर जाण्यास तयार असतात, परंतु त्यांचा भंडाफोड झाल्यावर ते पकडले जातात. अशाच एका व्यक्तीचा पर्दाफाश झाला आहे ज्याने पैशासाठी एक, दोन नाही तर विविध राज्यात तब्बल 17 महिलांशी लग्न केले. त्या महिलांची फसवणूक करून तो व्यक्ती फरार व्हायचा.या आरोपीला ओडिशा पोलिसांनी सोमवारी अटक केली. या प्रकरणाच्या तपासासाठी आता विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.(Fake Doctor Arrested In Odisha)

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अनेक महिलांशी लग्न करून फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ओडिशातील रमेश स्वेन याच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष तपास पथक (Sit) स्थापन करण्यात आले आहे. या SIT मध्ये महिला ठाण्याचे प्रभारी निरीक्षक (IIC) आणि दोन उपनिरीक्षकांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, रमेश स्वेनचा फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला जाईल आणि त्याच्या आर्थिक व्यवहाराचीही चौकशी केली जाईल.

जुलै 2021 मध्ये दिल्लीतील एका शिक्षीकेने याविरोधात तक्रार दाखल केली होती. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, स्वेनने आपल्याशी नवी दिल्लीतील (Delhi) आर्य समाज मंदिरात लग्न केले होते. या तक्रारीनंतर रमेश स्वेन याला भुवनेश्वरच्या खंडगिरी भागातील भाड्याच्या घरातून अटक करण्यात आली. त्याने 7 राज्यातील 14 महिलांशी लग्न केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 498 (A), 419, 468, 471 आणि 494 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, त्याने विविध विवाह साइट्स आणि सोशल मीडियावर भेटलेल्या आणखी 13 महिलांची फसवणूक केल्याचे ही निष्पन्न झाले.

त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, भुवनेश्वरचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) उमाशंकर दास यांनी सांगितले की, रमेश स्वेनने छत्तीसगड, आसाम (Assam) आणि ओडिशामधील आणखी तीन महिलांशी लग्न केले आहे. आरोपींनी वेगवेगळ्या राज्यातील एकुण 17 महिलांशी लग्न केले. डीसीपी दास यांनी सांगितले की, गुवाहाटीमध्ये राहणारी रमेश स्वेनची पत्नी डॉक्टर आहे, दुसरी छत्तीसगडमधील चार्टर्ड अकाउंटंट आहे, तर ओडिशाची तिसरी पत्नीही उच्चशिक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT