Twin Towers  File Image
देश

40 मजली Twin Towers होणार जमिनदोस्त; फ्लॅट बुक करणाऱ्यांच्या पैशांचे काय?

Twin Towersमध्ये गुंतवलेले लोकांचे पैसे पाण्यात जाणार का?

दैनिक गोमन्तक

सर्वोच्च न्यायालयाने (High Court) बेकायदा बांधकामांविरोधात मोठी कारवाई केली आहे, ज्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. सुपरटेक बिल्डरच्या (Supertech Builder) नोएडामध्ये (Noida) दोन 40 मजली इमारती आहेत, ज्या तीन महिन्यांत पाडल्या जाणार आहेत. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, दोन्ही टावर पाडून टाकावेत, म्हणजेच त्या इमारती जमिनदोस्त कराव्यात असे आदेशात म्हटले आहे. या इमारती जिथे बांधल्या गेल्या, तिथे शेकडो फ्लॅट (Flat) बुक करण्यात आले आहेत. तेव्हा लोकांचे पैसे पाण्यात जाणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. या जागेवर आता फक्त ताबा शिल्लक राहिला. आता ते पैसे कसे मिळवायचे आणि ते कधी मिळणार हे जाणून घेवूया.

कोणती इमारत पाडली जाईल?

या दोन्ही इमारतींना ट्विन टॉवर्स (twin towers in Noida) म्हणतात. दोन्ही इमारती सेक्टर 93 म्हणजेच एक्सप्रेस वेच्या बाजूला आहेत. त्यांचे नाव एमरल्ड कोर्ट ट्विन टॉवर्स आहे. सुपरटेकच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही टॉवरमध्ये सुमारे 1000 फ्लॅट आहेत. त्यापैकी 633 फ्लॅटचे बुकिंग झाले आहे. या प्रोजेक्ट मध्ये 133 लोकांनी गुंतवणूक केली आहे. त्यापैकी 248 लांकानी आपले पैसे काढले आहे, तर 252 लोकांचे पैसे अजूनही अडकले आहेत.

कारवाई का करावी लागली?

हे ट्विन टॉवर्स बेकायदेशीर बांधकाम असल्याने तोडावे लागले आहे. हे सुपरटेक बिल्डर आणि नोएडा प्राधिकरणाच्या संगनमताने केले गेले. ज्या जमिनीवर टॉवर उभा आहे ती जागा खेळण्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. ती जागा सुपरटेकची होती पण त्याने पार्कच्या जागेवरच बेकायदेशीरपणे दोन्ही टॉवर उभारले. या प्रकरणात आधीच म्हणजे 2014 मध्ये उच्च न्यायालयाने इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. पण बिल्डर त्याविरोधात सुप्रीम कोर्टात गेले, पण आज सर्वोच्च न्यायालयाने हे दोन्ही टॉवर बेकायदेशीर आहेत आणि ते पाडले पाहिजेत असे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे.

पैसे परत कसे मिळवायचे?

  1. ज्या वक्तीचा फ्लॅट आहे त्यांनी सुपरटेक बिल्डरच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

  2. बुकिंगच्या वेळी तुम्हाला भेटलेली सर्व कागदपत्रे, पेमेंट पावत्या आणि करार इ. सोबत घेवून जावे.

  3. कोर्टाने बिल्डरला दोन महिन्यांत पैसे परत करण्यास सांगितले आहे

  4. तुमच्या अडकलेल्या पैशावर वार्षिक 12% व्याज मिळेल

  5. बुकिंग केल्याच्या दिवसापासून आतापर्यंत पूर्ण व्याज दिले जाईल. सर्वोच्च न्यायालयाने बिल्डरला प्रत्येकाचे पैसे परत करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT