Rahul Gandhi Criticize Narendra Modi Dainik Gomantak
देश

कोरोनाकाळात सरकारच्या दुर्लक्षामुळे 40 लाख लोकांचा बळी गेला: राहुल गांधी

पुन्हा एकदा सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

दैनिक गोमन्तक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी रविवारी दावा केला की, सरकारच्या निष्काळजीपणामुळे 40 लाख भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, त्यांनी पुन्हा एकदा सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली. राहुल यांनीे ट्विटरवर एका यूएस वृत्तपत्राच्या अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात असा दावा करण्यात आला आहे की जगभरात कोविड मृत्यूची (Corona Death) आकडेवारी सार्वजनिक करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रयत्नांना भारत अडथळे आणत आहे. (Rahul Gandhi Criticize Narendra Modi)

'प्रत्येक कोरोना मृताच्या कुटुंबाला 4-4 लाखांची भरपाई मिळावी'

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मोदीजी ना खरे बोलतात, ना बोलू देतात. ते अजूनही खोटे बोलतात की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचा मृत्यू झाला नाही!' राहुल (Rahul Gandhi) म्हणाले, 'मी यापूर्वीही म्हटले होते - कोविडच्या काळात सरकारच्या दुर्लक्षामुळे पाच लाख नव्हे तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे. कर्तव्य पाळा, मोदीजी - प्रत्येक पीडित कुटुंबाला चार लाख रुपयांची भरपाई द्या.'

भारताने शनिवारी देशातील कोविड-19 मृत्यू दराचा अंदाज लावण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की, एवढा मोठा भौगोलिक आकार आणि लोकसंख्या असलेल्या देशात मृत्यूच्या संख्येचा अंदाज लावण्यासाठी अशा गणितीय मॉडेल्सचा वापर केला जाऊ शकत नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 16 एप्रिल रोजी एका अमेरिकन वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या 'जागतिक कोविड मृत्यूची संख्या सार्वजनिक करण्यासाठी WHOच्या प्रयत्नांना भारत अडथळा आणत आहे' या शीर्षकाच्या लेखाला उत्तर देताना हे सांगितले.

मंत्रालयाने म्हटले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने अवलंबलेल्या पद्धतीबद्दल देशाने अनेक वेळा चिंता व्यक्त केली आहे. त्याचवेळी, सरकारने कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यूंची खरी आकडेवारी जाहीर केली नसल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. पक्षाने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT