Woman Passenger in Flight Arrested: विमानातून प्रवास करत असलेल्या एका महिलेने विमानाच्या प्रसाधनगृहात (Lavatory) धुम्रपान केल्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. बंगळूरला जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला. बंगळूरमध्ये विमान उतरल्यानंतर विमानाच्या क्रुने या महिलेला सुरक्षारक्षकांच्या स्वाधीन केले.
अटक करण्यात आलेली ही २४ वर्षीय महिला मूळची पश्चिम बंगाल सियालदह येथील आहे. या महिलेचे नाव प्रियंका चक्रवर्ती असे आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला होता. रविवारी रात्री इंडिगोच्या फ्लाईट क्रमांक 6E 716 मधून प्रियंका प्रवास करत होती.
या विमानाने कोलकाताहून रात्री ९.५० वाजता उड्डाण केले होते आणि तीन तासानंतर हे विमान बंगळूरमध्ये उतरले.
या प्रवासादरम्यान प्रियंका विमानाच्या स्वच्छतागृहात धुम्रपान करत असल्याच्या संशय विमानातील क्रु सदस्यांना आला. तिला दरवाजा उघडायला सांगितल्यावर डस्टबिनमध्ये सिगारेट आढळून आली.
त्यानंतर क्रु सदस्यांनी तातडीने डस्टबिनमध्ये पाणी ओतून सिगारेट विझवली. फ्लाईट कॅप्टनने प्रियंकाला नियम मोडणारी प्रवासी म्हणून घोषित केले. त्यामुळे बंगळूरमध्ये फ्लाईट लँड झाल्यानंतर प्रियांकाला लगेचच विमानतळावरील सुरक्षारक्षकांकडे सोपविण्यात आले.
दरम्यान, इंडिगोच्या इंटरग्लोब एव्हिएशनचे सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापक शंकर के. यांनी प्रियंका चक्रवर्तीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घातल्याचे कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.