Death Dainik Gomantak
देश

बिहारमध्ये एकाच दिवसात 22 जणांचा बुडून मृत्यू, सणाच्या आनंदाचे रुपांतर शोकात

Bihar News: बिहारमध्ये जीवित्पुत्रिका (जितिया) उत्सवानिमित्त विविध जिल्ह्यांमध्ये नद्या आणि तलावात स्नान करण्यासाठी गेलेल्या 22 जणांचा बुडून मृत्यू झाला.

Manish Jadhav

Bihar News: बिहारमध्ये जीवित्पुत्रिका (जितिया) उत्सवानिमित्त विविध जिल्ह्यांमध्ये नद्या आणि तलावात स्नान करण्यासाठी गेलेल्या 22 जणांचा बुडून मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली.

गेल्या 24 तासात या घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. यातील बहुतांश घटना जीवित्पुत्रिका उत्सवासाठी स्नान करताना घडल्या आहेत.

राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात घडलेल्या या घटनांबद्दल दु:ख व्यक्त करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

दरम्यान, राज्यात सणासुदीच्या दिवशी बुडून मृत्यू होण्याच्या सर्वाधिक घटना भोजपूरमध्ये घडल्या आहेत. जिल्ह्यातील बहियारा येथे सेल्फी काढताना पाच मुलींचा सोन नदीत बुडून मृत्यू झाला.

नदीकाठी स्नान करणाऱ्या घरातील इतर महिलांनी (Women) आरडाआरोडा केली तेव्हा स्थानिक गोताखोर घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत बराच उशीर होऊन पाचही जण नदीत बुडाले होते. पाचही मुलींचा बुडून मृत्यू झाला.

दुसरीकडे, मुख्यमंत्री कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात भोजपूर जिल्ह्याव्यतिरिक्त जहानाबादमध्ये चार जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. पाटणा आणि रोहतासमध्ये प्रत्येकी तीन जणांचा बुडून मृत्यू झाला.

दरभंगा आणि नवाडा येथेही प्रत्येकी दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. कैमूर, मधेपुरा आणि औरंगाबाद येथे प्रत्येकी एकाचा बुडून मृत्यू झाला. या घटनांनंतर मृतांच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे.

सणाच्या आनंदाचे रुपांतर शोकात झाले

राज्यात महिला जीवित्पुत्रिका सण मोठ्या आनंदात साजरा करतात. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी उपवास करतात. सणासुदीच्या दिवशी घडलेल्या घटनांमुळे मृतकांच्या घरावर शोककळा पसरली आहे.

सणाच्या आनंदाचे रुपांतर शोकात झाले. भोजपूर जिल्ह्यातील बहियार येथील पाच मुलींचा (Girls) नदीत बुडून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या दुःखाच्या वेळी पीडित कुटुंबांना मदत करण्याबाबत बोलले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT