Bihar Caste Based Census: बिहारमध्ये २७ टक्के लोक मागास, जातीनिहाय जनगणनेतून समोर आले राज्याचे चित्र

बिहार सरकारने सोमवारी राज्याचा जाती निहाय जनगणना अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यानुसार बिहारची लोकसंख्या १३ कोटींहून अधिक आहे. यामध्ये सवर्ण लोकसंख्या १५.५२%, यादव १४%, अनुसूचित जमाती १.६८%, राजपूत ३.४५, मुस्लिम १७.०७%, भूमिहार २.८९%, मुसहर ३% आहेत.
Caste wise census of Bihar released; The population is more than 13 crores, 15 percent upper class and 27 percent backward people.
Caste wise census of Bihar released; The population is more than 13 crores, 15 percent upper class and 27 percent backward people.Dainik Gomantak

Caste wise census of Bihar released; The population is more than 13 crores, 15 percent upper class and 27 percent backward people:

बिहार सरकारने सोमवारी राज्याचा जातीनिहाय जनगणना अहवाल प्रसिद्ध केला असून त्यानुसार बिहारची लोकसंख्या १३ कोटींहून अधिक आहे. यामध्ये सवर्ण लोकसंख्या १५.५२%, यादव १४%, अनुसूचित जमाती १.६८%, राजपूत ३.४५, मुस्लिम १७.०७%, भूमिहार २.८९%, मुसहर ३% आहेत.

बिहारचे मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी सोमवारी अहवाल जारी करताना सांगितले की, बिहारमध्ये झालेल्या जाती आधारित जनगणनेच्या अहवालात बिहारची एकूण लोकसंख्या १३ कोटींपेक्षा थोडी जास्त असल्याचे समोर आले आहे.

त्यापैकी 36.01 टक्के असलेला EBC हा सर्वात मोठा सामाजिक वर्ग आहे. यानंतर मागासवर्गीय (OBC) 27.13 टक्के आहेत. सर्वसाधारण श्रेणी 15.52% आहे.

बहुप्रतीक्षित जात-आधारित जनगणनेच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, इतर मागासवर्गीय (OBC) आणि अत्यंत मागासवर्गीय (EBC) राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 63 टक्के आहेत.

जातीनिहाय जनगणना अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, “आज गांधी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर बिहारमध्ये करण्यात आलेल्या जात आधारित जनगणनेची आकडेवारी प्रकाशित करण्यात आली आहे.

जातनिहाय जनगणनेच्या कामात योगदान दिलेल्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन. जात आधारित गणनेचा प्रस्ताव विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "बिहार विधानसभेच्या सर्व 9 पक्षांच्या संमतीने, राज्य सरकारने स्वतःच्या संसाधनातून जात आधारित जनगणना केली आहे. त्यासाठी जून 2022 मध्ये मंत्रिपरिषदेकडून त्याला मान्यता देण्यात आली होती.

या आधारे राज्य सरकारने स्वत:च्या संसाधनातून जातनिहाय जनगणना केली आहे. जातीवर आधारित जनगणनेने केवळ जातीच उघड केल्या नाहीत तर प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीचीही माहिती दिली. त्या आधारावर सर्व घटकांच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी पुढील कार्यवाही केली जाईल.

ते म्हणाले, "बिहारमध्ये करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेबाबत बिहार विधानसभेच्या त्याच 9 पक्षांची लवकरच बैठक बोलावण्यात येईल आणि त्यांना जातनिहाय जनगणनेच्या निकालांबद्दल माहिती दिली जाईल."

आकडेवारीनुसार, बिहारमध्ये हिंदू लोकसंख्या ८१.९९ टक्के, ख्रिश्चन ०.०५ टक्के, शीख ०.०१ टक्के, बौद्ध ०.०८ टक्के आणि मुस्लिम लोकसंख्या १७.०७ टक्के आहे.

सरकारी अहवालानुसार, बिहारमध्ये 19 टक्के अनुसूचित जाती आणि 1.68 टक्के अनुसूचित जाती आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com