Audi RS Q8 Performance Dainik Gomantak
देश

Audi RS Q8 Performance: 3.6 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग! ऑडीची दमदार, शानदार कार लॉन्च; किंमत किती?

Audi RS Q8 Performance Launch: जर्मन कार उत्पादक कंपनी ऑडीने भारतात आरएस क्यू८ परफॉर्मन्स लॉन्च केली आहे.

Sameer Amunekar

ऑडी ही एक लोकप्रिय जर्मन कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या कार्स लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. ऑडी कंपनीने ऑडी आरएस क्यू8 परफॉर्मन्स बाजारात लॉन्च केली आहे.

ऑडी आरएस क्यू8 परफॉर्मन्स मध्ये कंपनीने ४.० लिटर क्षमतेचे V८ इंजिन दिलं आहे. या इंजिनमुळं कारला ६४० हॉर्स पावर मिळणार, तर ८५० न्यूटन मीटर टॉर्क मिळेल. त्यामुळे ही कार ही कार फक्त ३.४ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेगान चालवता येणार आहे.

तसंच, या गाडीमध्ये ८स्पीड ट्रिपट्रॉनिक ट्रान्समिशन सिस्टीम दिली आहे, जी आणखी स्मूथ ड्रायव्हिंग अनुभव देईल. या गाडीची टॉप स्पीड २५० किलोमीटर प्रति तास असेल, जी तुम्हाला तुफान गतीचा अनुभव देईल.

Audi RS Q8 Performance

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, ''ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍सचे लाँच भारतात सर्वोत्तम ऑडी परफॉर्मन्‍स कार्स आणण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेमधील महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे.

भारतात आमच्‍या आरएस मॉडेल्‍सना मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादामधून आम्‍हाला विशेषत: ऑडी आरएस क्‍यू८ चे जवळपास निम्‍मे ग्राहक असलेल्‍या तरूण ग्राहकांसाठी आमचा परफॉर्मन्‍स कार पोर्टफोलिओ विस्‍तारित करत राहण्‍यास प्रेरणा मिळाली आहे, असं बलबीर सिंग धिल्‍लों म्हणाले.

Audi RS Q8 Performance

ऑडी आरएस क्यू८ चे प्रमुख फीचर्स

  1. 22 आणि 23 इंच अलॉय व्हील्स: ऑडी आरएस क्यू8 मध्ये 22 आणि 23 इंच आकाराचे प्रीमियम अलॉय व्हील्स दिले गेले आहेत, जे कारच्या लुकला आकर्षक रूप देतात.

  2. 360 डिग्री कॅमेरा: ड्रायव्हिंग आणि पार्किंग करतांना अधिक सुरक्षितता आणि सुविधा मिळवण्यासाठी 360 डिग्री कॅमेरा प्रणाली दिली गेली आहे. या फीचरमुळे गाडीच्या आसपासचे संपूर्ण दृश्य ड्रायव्हरला पाहायला मिळते.

  3. 12.3 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम: कारमध्ये 12.3 इंचाची अत्याधुनिक इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे, जी स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, आणि म्युझिकसाठी इंटरएक्टिव्ह फीचर्स देते.

  1. 12.3 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर: ड्रायव्हरला ड्रायव्हिंगसंबंधी संपूर्ण माहिती सहजपणे मिळवण्यासाठी एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला गेला आहे.

  2. Bang and Olufsen ऑडिओ सिस्टम: 23 स्पीकर्ससह, या प्रीमियम ऑडिओ सिस्टममुळे कारमध्ये म्युझिकचा अनुभव घेता येणार आहे.

Audi RS Q8 Performance

लक्झरी सुविधांचा समावेश

  1. एचडी मॅट्रिक्‍स हेडलाइट्ससह ऑडी लेझर लाइट: ऑडीने आपल्या लक्झरी आणि परफॉर्मन्स कार्समध्ये अत्याधुनिक लाइटिंग तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुरक्षित आणि प्रीमियम होतो.

  2. फ्रण्‍ट स्‍पोर्ट सीट्स प्‍लस: ऑडीच्या लक्झरी आणि परफॉर्मन्स कार्समध्ये फ्रंट स्पोर्ट सीट्स प्लस फीचर देण्यात आला आहे. या सीट्स कारच्या इंटीरियर्सला एक स्पोर्टी लुक आणि आरामदायक ड्रायव्हिंग अनुभव देतात.

Audi RS Q8 Performance

आठ रंगामध्ये उपलब्ध

ऑडीने आपल्या नवीन आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स कारसाठी रंग पर्याय दिले आहेत, जे गाडीला अधिक आकर्षक आणि खास बनवतात.

मिथोस ब्‍लॅक, ग्‍लेशियर व्‍हाइट, डेटोनो ग्रे, अस्‍कारी ब्‍ल्‍यू, चिली रेड, साखीर गोल्‍ड, सॅटेलाइट सिल्‍व्‍हर, वेटोमो ब्‍ल्‍यू आणि नऊ ऑडी एक्‍सक्‍लुसिव्‍ह रंगांमध्ये ही खरेदी करता येणार आहे.

किंमत

नवीन ऑडी आरएस क्‍यू८ भारतात २,४९,००,००० रूपये (एक्‍स-शोरूम) या सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध आहे. ही कार १०-वर्ष कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी रोडसाइड असिस्‍टण्‍सच्‍या ओनरशीप फायद्यासह येते. आकर्षक सर्वसमावेशक मेन्‍टेनन्‍स व सर्विस पॅकेजेस् देखील उपलब्‍ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT