20 ITBP jawans to be honored with Police Medal for Gallantry Dainik Gomantak
देश

'गलवान'च्या बलवानांना शौर्यपदक; 20 ITBP जवानांचा होणार सन्मान

आयटीबीपीला (ITBP) जवानांना त्यांच्या सीमा संरक्षणाच्या कर्तव्यामध्ये दाखवलेल्या शौर्यासाठी बहाल करण्यात आलेले हे सर्वोच्च शौर्य पदक (Police Medal for Gallantry) आहे.

दैनिक गोमन्तक

मागच्या वर्षी देश कोरोनाच्या विळख्यात असताना भारत आणि चीन यांच्यातला संघर्ष देखील वाढत होता. पुर्व लडाखमधील याच संघर्षादरम्यान गलवान खोऱ्यात 20 इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP) च्या जवानांनी चकमकीमध्ये मोठ्य़ा हिमतीने खिंड रोखुन धरली होती. या शौर्याबद्दल या जवानांना पोलीस पदक (Police Medal for Gallantry) प्रदान करण्यात आले आहे. उद्या 15 ऑगस्ट रोजी 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त, 23 इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) च्या जवानांना त्यांच्या शौर्यासाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यापैकी 20 जवानांना मे-जून, 2020 मध्ये पूर्व लडाखच्या चकमकींमध्ये दाखवलेल्या शौर्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे.

आयटीबीपीला जवानांना त्यांच्या सीमा रक्षण कर्तव्यांमध्ये दाखवलेल्या शौर्यासाठी बहाल करण्यात आलेले हे सर्वोच्च शौर्य पदक आहे. 8 जवानांना 15 जून 2020 रोजी गलवान येथे शौर्य, उच्च स्तरीय धोरण आणि मातृभूमीच्या संरक्षणासाठी पीएमजी पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहे. 18 मे 2020 रोजी फिंगर 4 परिसरात झालेल्या चकमकीदरम्यान 6 जवानांना शौर्य दाखवल्याबद्दल पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले. तर, 18 मे 2020 रोजी 6 जवानांना लडाखमध्येच हॉट स्प्रिंग्जजवळ त्यांच्या शौर्यासाठी पोलिस शौर्य पदक देण्यात आले आहे. या व्यतिरीक्त छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवायांमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल 3 जवानांना पोलीस शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पोलीस शौर्य पुरस्कार करण्यात आलेल्या पुर्व लडाखमधील जवान
1 रिंकू थापा, कमांडिंग ऑफिसर
2 शरतकुमार त्रिपाठी, डेप्युटी कमांडंट
3 अरबिंद कुमार महतो, असीस्टंट कमांडंट
4 नितीन कुमार, निरीक्षक
5 पाटील सचिन मोहन, उपनिरीक्षक
6 मनीष कुमार, हेड कॉन्स्टेबल
7 मनीष कुमार, कॉन्स्टेबल
8 कौपासामी एम, कॉन्स्टेबल
9 अक्षय आहूजा, असीस्टंट कमांडंट
10 धर्मेंद्र कुमार विश्वकर्मा, सहाय्यक कमांडंट
11 रवींद्र महाराणा, पोलीस निरीक्षक
12 शिव शंकर तिवारी, हेड कॉन्स्टेबल
13 स्टैनज़िन थिनल्स, कॉन्स्टेबल
14 विनोद कुमार शर्मा सप्टेंबर
15 किशोर सिंग बिश्ट, कमांडंट
16 पंकज श्रीवास्तव, सहायकCommand कमांडंट

17 घनश्याम साहू, निरीक्षक
18 अशरफ अली, कॉन्स्टेबल
19 मो. शफकत मीर, कॉन्स्टेबल
20 रिग्झिन दावा, कॉन्स्टेबल

ANO (जुलै 2018 मध्ये नक्षलविरोधी कारवाईसाठी):
21 रवींदर सिंग पुनिया, सहाय्यक कमांडंट
22 कुलदीप सिंग, निरीक्षक
23 एस मुथू राजा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT