Stray Dogs Gomantak Digital
देश

भटक्या कुत्र्यांमुळे आणखी एक बळी! २ वर्षांच्या चिमुरडीचे लचके तोडले

Stray Dogs Bite: अनेक अवयव निकामी झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Toddler dies in Surat after attacked by stray dogs

हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सुरतमध्येही अशाच स्वरुपाची घटना समोर आलीये. बांधकाम मजुराच्या दोन वर्षांच्या मुलीचे भटक्या कुत्र्यांनी अक्षरश: लचके तोडले. तीन ते चार भटक्या कुत्र्यांनी केलेल्या या हल्ल्यात चिमुरडीच्या अंगावर तब्बल ४० जखमा होत्या. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीवर सुरतमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर तीन दिवसांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सुरतमध्ये राहणारे रवी कहार हे एका बांधकाम साईटवर मजूर आहेत. कहार दाम्पत्य हे मूळचे पश्चिम बंगालचे असून रोजगारासाठी ते काही महिन्यांपासून गुजरातमध्ये आहेत. १९ फेब्रुवारी रोजी रवी आणि त्यांची पत्नी शर्मिला कामासाठी साईटवर गेले होते. मुलीकडे लक्ष द्या, असं या दाम्पत्याने शेजारच्यांना सांगितलं होते.काही वेळाने स्थानिकांना २ वर्षांच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचे लक्षात आले. त्यांनी कशीबशी त्या चिमुरडीची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. या प्रकाराची माहिती मिळताच रवी हे तातडीने घरी परतले. गंभीर जखमी झालेल्या मुलीला त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी नेले.

२ वर्षांची हर्सिला रुग्णालयात आली त्यावेळी तिच्या अंगावर तबब्ल ४० ते ५० ठिकाणी जखमा होत्या. काही जखमा ऐवढ्या खोल होत्या की तिला टाकेदेखील घातले. तिला अँटीबायोटिक्स देण्यात आले. मात्र, तिचे वय पाहता औषधोपचारांना तिच्या शरीराने प्रतिसाद दिला नाही. अखेर तीन दिवसांनी तिचा मृत्यू झाला, अशी माहिती सुरतमधील न्यू सिव्हिल हॉस्पिटलचे आरएमओ डॉ. केतन नाईक यांनी माध्यमांना दिली.

या घटनेनंतर सुरतमधील प्रशासकीय यंत्रणांनी भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. दररोज किमान ३० ते ५० कुत्र्यांचं निर्बिजीकरण सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. १ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सुरतमध्ये श्वानदंशाच्या ४७० घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

हैदराबादमध्येही घडली होती घटना

काही दिवसांपूर्वी 5 वर्षाच्या मुलाची चार कुत्र्यांनी चावल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले होते. 8 फेब्रुवारीपासून कुत्र्यांच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रशासनाने यावर पाऊले उचलावीत अशी नागरिक मागणी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT