SBI Gold Theft Dainik Gomantak
देश

Kanpur Money Heist: मनी हाईस्टप्रमाणे बोगदा खोदून SBI मधून 2 किलो सोन्याची चोरी

कानपुरमध्ये पोलिस स्टेशनसमोरील बँकेतच चोरी, रोकड न्यायला मात्र विसरले...

Akshay Nirmale

Kanpur Money Heist SBI Gold Theft: नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील स्पॅनिश क्राईम थ्रिलर वेबसिरीज मनी हाईस्टप्रमाणेच कानपूरमध्ये बोगदा खोदून चक्क बँकेतून सोने लुटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सचेंडी येथील एसबीआय बँकेत चोरीची घटना घडली. चोरट्यांनी बँकेच्या मागून 8 फूट बोगदा खोदून सुमारे 2 किलो सोने नेले.

बुधवारी रात्री ही घटना घडली असून चोरट्यांना हा बोगदा खोदण्यासाठी 15 दिवस लागले असतील, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा बोगदा थेट बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये उघडत होता. त्यानंतर ड्रिल मशिनने फरशी तोडून आत प्रवेश केला. स्ट्राँग रूमचे लॉकर गॅस कटरने कापून सुमारे दोन किलो सोने चोरले. चोरट्यांनी एवढ्या सफाईने काम केले की बँकेचा अलार्मही वाजला नाही. गुरुवारी सकाळी बँकेचे कर्मचारी पोहोचले असता हा प्रकार उघडकीस आला.

सोने नेले, मात्र लाखोंची रोकड मागे राहिली. सोन्याशेजारी आणखी एक बॉक्स ठेवण्यात आला होता. त्यात 35 लाख रुपये होते, मात्र चोरट्यांनी त्याला हातही लावला नाही. शाखा व्यवस्थापक नीरज राय यांनी सांगितले की, या बँकेच्या मागे घर नाही आणि कोणीही राहत नाही. चोरटे बोगदा खोदून खोदकाम करत असताना कोणालाही सुगावा लागला नाही. या बँकेसमोर पोलीस चौकीही आहे. घटनेच्या रात्रीही रात्री 11 ते 1 वाजेपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त होता. तरीही धूर्त चोरट्यांनी सहज बँकेत चोरी केली.

20 दिवसांपूर्वी बँक व्यवस्थापनाने भिंतीत सोन्याची तिजोरी आणि रोकड तिजोरी लावली होती. या कामासाठी मजूर-मास्त्री स्ट्राँग रूमच्या आत गेले होते. सर्व लेबर मेकॅनिकचीही सखोल चौकशी केली जात आहे. चोरीला गेलेले सोने हे सोनेकर्ज घेतलेल्या २९ जणांचे आहे. सोन्याच्या कर्जापोटी ते बँकेत ठेवले होते. त्यांचाही पोलिस शोध घेत आहेत. चोरट्यांनी बँकेचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते. बँक कर्मचाऱ्यांवर पोलिसांना संशय असल्यामुळे पोलिस प्रत्येक कर्मचाऱ्याचे लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

IND vs SA 2nd Test: केएल राहुलला टर्न समजलाच नाही, सायमन हार्मरच्या 'अविश्वसनीय' चेंडूवर त्रिफळाचीत! तुम्ही VIDEO पाहिला का?

Smriti Mandhana: 'तिला' स्विमिंगसाठी विचारलं! पलाश मुच्छलचे भलत्याच मुलीसोबत चॅट्स व्हायरल; क्रिकेटर स्मृतीला मोठा धक्का?

Goa News: ५६ व्या IFFI मध्ये विविध राज्यांच्या लोकनृत्यांचे दर्शन; कलाकारांनी मानले आभार

SCROLL FOR NEXT