Jallikattu Tamilnadu Dainik Gomantak
देश

Jallikattu: तामिळनाडूत जल्लीकट्टू दरम्यान 19 जण जखमी; 800 खेळाडू होणार सहभागी

सुप्रीम कोर्टाने दिली होती 300 खेळाडू आणि 150 प्रेक्षकांना परवानगी

Akshay Nirmale

Jallikattu: तामिळनाडुतील मदुराईच्या तीन गावांमध्ये रविवारी पोंगलच्या दिवशी जल्लीकट्टू खेळाला सुरुवात झाली. जल्लीकट्टूदरम्यान 19 जण जखमी झाले आहेत. त्यातील 11 जणांना मदुराई येथील शासकीय राजाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जल्लीकट्टूला एरू थाझुवुथल आणि मनकुविरट्टू असेही म्हणतात. हा खेळ पोंगल सणाचा एक भाग आहे. मदुराईतील अवनियापुरम येथे रविवारी जल्लीकट्टूचे आयोजन करण्यात आले आहे. तर सोमवारी पलामेडूमध्ये आणि मंगळवारी अलंगनलूरमध्ये जलीकट्टू होणार आहे. जलीकट्टू हा एक खेळ आहे ज्यात बैलाला गर्दीत सोडले जाते आणि त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. या खेळात सहभागी होणाऱ्या लोकांना बैलाला धरून नियंत्रित करावे लागते.

मदुराईचे जिल्हाधिकारी अनिश शेखर म्हणाले- "अवनियापुरम येथे जल्लीकट्टू सुरळीत पार पडण्यासाठी सर्व व्यवस्था केल्या आहेत. बैल तसेच खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तीन स्तरीय बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे." आम्ही अवनियापुरममध्ये सुप्रीम कोर्ट आणि तमिळनाडू सरकारच्या सर्व नियमांचे पालन करू. न्यायालयाचे निर्देश आहेत की खेळात एकावेळी 25 खेळाडू खेळतील. यावेळी 800 खेळाडू सहभागी होतील."

जलीकट्टूत सहभागी होण्यासाठी केवळ 300 बैलगाडा आणि 150 प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. सुमारे 10,000 बैल आणि 5,400 बैल मालकांनी नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज दिले होते. त्यापैकी केवळ 800 बैलांना सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली. एक बैल तीनपैकी फक्त एका कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. जल्लीकट्टू सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच खेळता येईल.

सुमारे 2500 वर्षांपासून बैल हा प्राणी तामिळनाडूच्या लोकांच्या श्रद्धा आणि परंपरेचा भाग आहे. शेतात पिके तरारून आल्यानंतर येथील लोक दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी पोंगल सण साजरा करतात. तमिळमध्ये पोंगल म्हणजे उकळणे. या दिवशी त्यांच्या नवीन वर्षाची सुरूवात होते. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी बैलांची पूजा केली जाते. ते सजवले जातात. त्यानंतर जल्लीकट्टू खेळाची सुरूवात केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT