18 yr old girl ended her life in a neet coaching centre in coimbatore tamilnadu  Dainik Gomantak
देश

प्रियकराला बोलावलं घरी, प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल

दोघांच्या घरच्यांचा नात्याला होता विरोध

दैनिक गोमन्तक

तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली आहे. 18 वर्षीय विद्यार्थिनी येथील NEET कोचिंग सेंटरमध्ये शिकत होती. आणि प्रियकर तिथे वसतिगृहात राहत होता. शनिवारी कोचिंग सेंटरच्या एका खोलीत विद्यार्थिनीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक तपासात विद्यार्थ्याचे त्याच कोचिंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या तरुणाशी संबंध असल्याचे पोलिसांना आढळून आले. मात्र दोघांच्या घरच्यांचा या नात्याला विरोध होता.

पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या प्रियकराचे कुटुंबीय तिला मदुराई येथील त्यांच्या गावी परत येण्यास सांगत होते. यामुळे मुलगी चांगलीच अस्वस्थ झाली होती. आणि तिने आत्महत्या (Suicide) केली. सध्या पोलिसांनी (police) मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आणि गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

छिंदवाडा येथे विद्यार्थ्याची विष पिऊन आत्महत्या

नुकतेच मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एका 16 वर्षीय विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली. हे प्रकरण कुंडीपूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या धरम टेकडी चौकी परिसरातील आहे. मुलगी दहावीत शिकत असल्याचे सांगण्यात येत आहे. परीक्षा झाल्यामुळे ती तणावाखाली होती. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Chief Minister Statement: 'पुढील वर्षीही गोव्यात सत्तेचा सारथी मीच'! आयर्नमॅन स्पर्धेच्या मंचावरुन CM सावंतांचे सूचक वक्तव्य

Horoscope 2 November 2026: लाभ, प्रगती आणि संयमाची सांगड घालणारा आजचा दिवस!  'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; चंद्र-मंगळची युती ठरणार वरदान

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

India U19 Cricket: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकटची टीम इंडियात एंट्री; आशिया कपसाठी मिळाली संधी

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

SCROLL FOR NEXT