Dainik Gomantak
देश

Tripura: आई, आजोबा, बहिण, शेजाऱ्याची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकले; 16 वर्षीय मुलावर हत्येचा आरोप

आरोपी मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Tripura Crime News: धलाई जिल्हा, त्रिपुरा राज्यातील एका गावात 16 वर्षीय मुलावर चार जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. दुर्गम गावात एका 16 वर्षीय मुलाने त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांची तसेच, शेजाऱ्याची हत्या करून त्यांचे मृतदेह विहिरीत टाकल्याचा आरोप त्याच्यावर आरोप आहे. अशी माहिती त्रिपुरा पोलिसांनी दिली आहे. आरोपी मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कमलपूर विभागातील रहिवासी असलेल्या या मुलाला ड्रग्जचे व्यसन आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित मुलाने शनिवारी त्याची आई, आजोबा आणि 10 वर्षांची बहीण आणि शेजाऱ्याची हत्या केली. त्यावेळी मुलाचे वडील घरी नव्हते. या गुन्ह्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मुलाचे वडील घरी परतले असता त्यांना घरात सर्वत्र रक्त, मृतदेह विहिरीत टाकलेले दिसले. मुलाच्या वडिलांनी आरडाओरडा केला असता गोळा झालेल्या गावकऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. सकाळी साडेनऊच्या सुमारास आरोपीच्या घरातून मोठा आवाज ऐकू आला आणि थोड्या वेळानंतर विहिरीत पडलेले मृतदेह दिसले. अशी माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली.

दरम्यान घटना समोर आल्यानंतर परिसरात खळभळ पसरली आहे. शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. सर्व मृतदेहांवर जखमांच्या खुणा आहेत. मारेकऱ्याने चार जणांना मारण्यासाठी काहीतरी बोथट वस्तू वापरली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समजेल. असे त्रिपुरा पोलिसांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

France Protest: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

SCROLL FOR NEXT