Bihar  Dainik Gomantak
देश

बिहारमध्ये विषारी दारूमुळे 16 जणांचा मृत्यू ; पोस्टमॉर्टम न करताच सात जणांवर अंत्यसंस्कार

गुरुवारी जिल्ह्यातील 35 गावांतील लोकांनी विविध ठिकाणी दारूचे सेवन केले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात विषारी दारू पिऊन 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर, अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वांवर मोतिहारी आणि मुझफ्फरपूरच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुरुवारी जिल्ह्यातील 35 गावांतील लोकांनी विविध ठिकाणी दारूचे सेवन केले होते. रात्रीपासून सर्वांची प्रकृती ढासळू लागली. दुसऱ्या दिवशी एकामागून एक मृत्यू येऊ लागले. शनिवारपर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला.

(16 Dead After Consuming Illicit Liquor In Bihar's Motihari )

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटणा येथून एक विशेष पथक मोतिहारी येथे रवाना झाले आहे. यामध्ये 5 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये 2 डीएसपी आणि 3 इन्स्पेक्टर आहेत. दरम्यान, जिल्ह्याचे डीएम-एसपी यांनी, जुलाब -अन्न विषबाधामुळे हे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

मद्य पार्टीत सहभागी झालेले विनोद पासवान यांनी सांगितले की, जटा राम यांनी आम्हा सर्वांना गहू कापण्यासाठी बाळगंगा येथे बोलावले होते. तिथे काम करून सगळ्यांनी मिळून दारू प्यायली, मग तिथून घरी निघालो. जसजशी रात्र होत गेली तसतशी सर्वांची प्रकृती बिघडू लागली.

शुक्रवारी सायंकाळपर्यंत 8 जणांना जीव गमवावा लागला. शनिवारी सकाळी हा आकडा 16 वर पोहोचला. कुटुंबीयांनी पोस्टमॉर्टम न करताच 7 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.

मठ लोहियार येथे 24 तासांत पिता-पुत्राचा मृत्यू झाला. नवल दास यांचे प्रथम निधन झाले, त्यानंतर मुलगा परमेंद्र दास यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले. नवल यांच्या सुनेची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याला जुलाब झाल्याचे सांगितले.

बिहार भाजपने बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यूवरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि विरोधी भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHRC) अहवालावरून गेल्या वर्षी सारण जिल्ह्यात बनावट मद्य सेवन केल्यामुळे 40 जणांचा मृत्यू झाला होता. एनएचआरसीच्या या अहवालात सारण बनावट दारू प्रकरणासाठी प्रशासनाला दोषी ठरवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बाईक फुल स्पीडमध्ये, दोन्ही हात सोडले...तरुणीचा जीवघेणा स्टंट व्हायरल! पोलीस घेतायत शोध

Goa Crime: सांकवाळ येथे फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT