Vaibhav Suryavanshi Appointed Vice Captain Dainik Gomantak
देश

Vaibhav Suryavanshi Vice Captain: युवा तारा चमकला! 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची उपकर्णधारपदी नियुक्ती, 'या' संघाचं करणार नेतृत्व

Vaibhav Suryavanshi Appointed Vice Captain: १४ वर्षीय धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशीला उत्कृष्ट कामगिरीबद्दल खास बक्षीस देण्यात आले आहे.

Sameer Amunekar

१५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या २०२५ च्या रणजी ट्रॉफी आधीच क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. या स्पर्धेपूर्वी १४ वर्षीय धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशीला उत्कृष्ट कामगिरीबद्दल खास बक्षीस देण्यात आले आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाचा शानदार दौरा पार पाडून भारतात परतलेल्या वैभवने एकदिवसीय आणि कसोटी मालिकांमध्ये प्रभावी कामगिरी केली, आणि आता तो बिहार संघासाठी रणजी ट्रॉफीमध्ये उपकर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे.

वैभव सूर्यवंशीची उपकर्णधारपदी नियुक्ती

बिहार क्रिकेट असोसिएशनने १५ सदस्यीय रणजी ट्रॉफी संघाची घोषणा केली आहे. संघाचे नेतृत्व साकिबुल गनी करणार असून, वैभव सूर्यवंशीला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले गेले आहे. वैभवने बिहारसाठी आतापर्यंत खेळलेल्या पाच प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १० डावांमध्ये १०० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १८ चौकार आणि एक षटकार समाविष्ट आहे.

बिहार संघाचा पहिला सामना अरुणाचल प्रदेशविरुद्ध मोईन-उल-हक स्टेडियम, पाटणा येथे होणार आहे. या सामन्यात वैभवच्या अनुभवी आणि साहसी नेतृत्वाची अपेक्षा आहे.

वैभवचा जलवा

वैभव सूर्यवंशीने भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये दमदार कामगिरी केली. इंग्लंडविरुद्ध पाच युवा एकदिवसीय सामन्यांत त्याने १७४.०२ च्या स्ट्राईक रेटसह ३५५ धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याच्या शतकांनी क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले. या कामगिरीमुळे त्याला बिहार संघातील उपकर्णधारपदी नियुक्ती मिळाली आहे.

२०२५ रणजी ट्रॉफीसाठी बिहारचा संघ

बिहारचा रणजी संघ खालीलप्रमाणे:

पियुष कुमार सिंग, भास्कर दुबे, साकिबुल गनी (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अर्णव किशोर, आयुष लोहारुका, बिपिन सौरभ, अमोद यादव, नवाज खान, साकिब हुसेन, राघवेंद्र प्रताप सिंग, सचिन कुमार सिंग, हिमांशू सिंग, खालिद आलम, सचिन कुमार

बिहार संघातील युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या मिश्रणामुळे रणजी ट्रॉफीमध्ये संघाची कामगिरी लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्त्वाखाली बिहार संघाचा सामना प्रत्येक सामन्यात उत्साहवर्धक ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Job Creation: रोजगार निर्मितीचा महाविक्रम! 17 कोटी नवीन नोकऱ्यांची निर्मिती, बेरोजगारी दरात 50 टक्क्यांची ऐतिहासिक घट

Thivim Railway Accident: थिवीत रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू, कोकण रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरु; अपघाताचे गूढ कायम?

Goa Rain: हाय सायबा! दिवाळीपर्यंत पाऊस करणार मुक्काम; 2 दिवसांसाठी राज्यात 'Yellow Alert'

Goa Tourism: टॅक्सी, लॉजिंग, सीफूड झाले स्वस्त! GST कमी झाल्याने गोव्यात खिशाला परवडणाऱ्या पैशात करता येणार पर्यटन

Narkasur in Goa: संपूर्ण भारतापेक्षा गोव्याची दिवाळी असते खास! राक्षस वधाने होते पहाट, कुठे पाहाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

SCROLL FOR NEXT