Cheetahs Dainik Gomantak
देश

Cheetah In India: दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्यांची दुसरी तुकडी लवकरच भारतात होणार दाखल

Kuno National Park: दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्यांची दुसरी तुकडी 18 फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये (KNP) पोहोचण्याची शक्यता आहे.

Manish Jadhav

Kuno National Park: दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्यांची दुसरी तुकडी 18 फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये (KNP) पोहोचण्याची शक्यता आहे. एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली.

प्रधान मुख्य वनसंरक्षक जे.एस. चौहान म्हणाले की, सध्याच्या योजनेनुसार 18 फेब्रुवारी रोजी आणखी 12 चित्ते केएनपीमध्ये आणले जात आहेत. कुनो येथे नेण्यापूर्वी या चित्त्यांना दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) ग्वाल्हेरला नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिका-याने सांगितले की, 12 च्या तुकडीत नर आणि मादी चित्त्यांची संख्या किती आहे, याची मला माहिती नाही.

दरम्यान, चीता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यावर सरकार (Government) काम करत असून दक्षिण आफ्रिकेसोबत करार केला आहे. दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणले जातील. चीता प्रकल्पांतर्गत आठ चित्त्यांना नामिबियातून भारतात आणण्यात आले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात चित्ते सोडले होते.

ते पुढे म्हणाले की, नियमानुसार चित्त्यांना महिनाभर विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या 72 व्या वाढदिवशी नामिबियातील आठ चित्त्यांची पहिली तुकडी - पाच मादी आणि तीन नर - KNP येथे विलगीकरण केंद्रात सोडली होती.

दुसरीकडे, प्रजाती नामशेष झाल्यानंतर सुमारे सात दशकांनंतर चित्ता भारतात पुन्हा दाखल होत आहेत. देशातील शेवटचा चित्ता 1947 मध्ये सध्याच्या छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात मरण पावला आणि 1952 मध्ये ही प्रजाती भारतातून (India) नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: पक्षांतर, सरकारी 'खोगीरभरती' अन् बेरोजगारीवर घणाघात! मतदारांनी आता जाब विचारावा; 2027ची विधानसभा निवडणूक ठरवणार गोव्याच्या राजकारणाची दिशा?

Asian Games Semi Final 2026: शेफालीचं धडाकेबाज शतक, दीप्ती-नंदनीचा घातक मारा! बांगलादेशचा धुव्वा उडवत भारताची फायनलमध्ये धडक; गोल्डसाठी श्रीलंकेशी भिडणार

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार? तज्ज्ञांच्या विविध पर्यायांवर चर्चा, अंतिम निर्णय

Houthi Saudi Conflict: सौदी अरेबियानंतर कुणाचा नंबर? हूतींच्या धमकीमुळे पाकिस्तान-तुर्कीच्या गोटात घबराट; म्हणाले, ''परकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही!" VIDEO

Goa Political Satire: 'देव दिता आनी देवचार नाडटा'; गणपतीसमोर पाच दिवस भक्ती केली, पण चौथ्याच दिवशी 'पणती'ने घात केला!

SCROLL FOR NEXT