पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मागिल वर्षी त्यांच्याच हस्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातील आठ चित्ते सोडले गेले. त्यानंतर या परदेशी पाहुण्याने देशभरातील लोकांनी स्वागत केले.
परदेशातून पुन्हा एकदा चित्ते भारतात येणार आहेत. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कला आणखी चित्ते मिळणार आहेत. कुनो येथे नामिबियातून आणलेल्या 8 चित्तांचा यशस्वीपणे सांभाळ केल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणण्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.
यावेळी दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात येत आहेत. त्यांना 26 जानेवारीला कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येणार आहे. मध्य प्रदेश सरकारने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. कुनोला येणारे हे चित्ते आधीच दक्षिण आफ्रिकेत क्वारंटाईनमध्ये ठेवले आहेत.
दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात येत आहेत. त्यापैकी 7 नर तर 5 मादी चित्ते आहेत. या चित्त्यांना 25 जानेवारीला दिल्लीहून ग्वाल्हेरला आणण्यात येणार आहे. त्यानंतर ग्वाल्हेरहून कुनो नॅशनल पार्कमध्ये हेलिकॉप्टरने नेण्यात येणार आहे.
चित्त्यांना आणण्यासाठी केंद्रीय वन महासंचालक चंद्र प्रकाश गोयल, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (NTCA) सदस्य सचिव एसपी यादव आणि केंद्रीय वन मंत्रालयाचे इतर अधिकारी 20 ते 21 जानेवारी रोजी दिल्लीहून दक्षिण
आफ्रिकेला रवाना होतील. कुनो नॅशनल पार्क दक्षिण आफ्रिकेतील या नवीन पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.
नुकतेच मध्य प्रदेशचे वनमंत्री कुनो नॅशनल पार्कमध्ये आले होते. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या12 चित्त्यांसाठी कुनोमध्ये केलेली व्यवस्था त्यांनी पाहिली. तसेच सुरक्षेशी संबंधित सर्व बाबींची सविस्तर माहिती घेतली.
विशेष म्हणजे 1952 मध्ये भारत सरकारने देशातील चित्ता नामशेष झाल्याचे घोषित केले होते. शेवटचा चित्ता 1948 मध्ये छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात दिसला होता.
1952 मध्ये देशातून ही प्रजाती नामशेष झाल्याचे घोषित केल्यानंतर 70 वर्षांनी नामिबियातून चित्त्यांचे आगमन झाले आहे. या करारांतर्गत आतापर्यंत 8 चित्ते भारतात आले आहेत. आता 26 जानेवारीला आणखी 12 चित्ते भारतात येण्यासाठी सज्ज आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.