Artists Dainik Gomantak
देश

Assam Bihu Dance: एक हजाराहून अधिक कलाकारांनी बिहू नृत्य करत केला वर्ल्ड रेकॉर्ड, Vedio

Assam: जगभरातील लोक 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात. मात्र, असले तरी आसाममध्ये 13 एप्रिलला नवीन वर्षाचा उत्साह पाहायला मिळाला.

Manish Jadhav

Assam Bihu Dance: जगभरातील लोक 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात. मात्र, असले तरी आसाममध्ये 13 एप्रिलला नवीन वर्षाचा उत्साह पाहायला मिळाला.

गुवाहाटीतील सरुसजाई स्टेडियमवर गुरुवारी संध्याकाळी एक हजाराहून अधिक कलाकारांनी एकत्र बिहू नृत्य करुन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. बिहू उत्सवाला आसामी संस्कृतीची जीवनरेखा देखील म्हटले जाते.

दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) उपस्थित होते. यावेळी 11,304 बिहुआ-बिहुवतींनी एकत्र नृत्य केले. नर्तकांसोबतच 2528 ढोलकी वादकांनीही येथे सादरीकरण केले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते.

पीएम मोदींच्या उपस्थितीत सरकारकडून प्रमाणपत्र मिळणार आहे

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींची टीम स्टेडियममध्ये उपस्थित होती. 14 एप्रिलला अर्थात, आज पंतप्रधान मोदी आसामला (Assam) भेट देणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत या रेकॉर्डचे प्रमाणपत्र आसाम सरकारला सुपूर्द केले जाणार आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री हिमंता बिसवा यांनी सर्व बिहुवा-बिहुतींचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT