100 year old woman booked by UP police  DainikGomantak
देश

FIR on 100 years old lady: होय, खरंच! 100 वर्षीय महिलेवर खंडणीचा गुन्हा; उत्तर प्रदेश पोलिसांचा प्रताप

Kanpur Police: एफआयआरमध्ये डोळ्यांनी पाहू न शकणाऱ्या 100 वर्षीय महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले.

गोमन्तक डिजिटल टीम

Uttar Pradesh Police

उत्तर प्रदेश पोलीस (Uttar Pradesh Police) नेहमीच कोणत्या न कोणत्या गोष्टींसाठी चर्चेत असतात. आता कानपूर पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कानपूर पोलिसांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरं तर, वरील छायाचित्रात पहात असलेली महिला 100 वर्षांची आहे, ती आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, परंतु कानपूर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही महिला खंडनीची मागणी करते. या विरोधात पोलिसांनी कानपूरमधील कल्याणपूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

हे प्रकरण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यावर ठाणे प्रमुखाला चांगलेच फटकारले आणि तपास सीओकडे सोपवण्यात आला. आता पहिला FIR रद्द केला असून, या प्रकरणातून या महिलेचे नाव वगळण्यात आले आहे.  

हे प्रकरण कानपूर महानगरातील कल्याणपूर पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. जिथे एफआयआरमध्ये डोळ्यांनी पाहू न शकणाऱ्या 100 वर्षीय महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले.

हे प्रकरण पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्याचवेळी पोलीस सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेत वृद्ध महिलेचे FIR मधून नाव हटवून चौकशीचे आदेश दिले.  

पोलिसांच्या अहवालानुसार, चंद्र काली, ज्या सुमारे 100 वर्षांच्या आहेत, त्यांच्या मालकीचा एक भूखंड आहे ज्यावर काही लोकांना जबरदस्तीने कब्जा करायचा होता.

या प्रकरणी, माधुरी नावाच्या महिलेविरुद्ध तिच्या कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केला होता, त्यानंतर माधुरीच्या वतीने क्रॉस एफआयआर देखील दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये वृद्ध महिला चंद्रा काली आणि तिच्या कुटुंबियांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पहिल्या FIR मधून महिलेचे नाव काढून टाकण्यात आल्याचे पोलिस सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश पोलिसांकडून वरील प्रकारासारखे अनेक गमतीशीर प्रकार घडले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल (Social Media Trool) होत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT