Jammu & Kashmir  Dainik Gomantak
देश

यासिन मलिकच्या शिक्षेला विरोध करणाऱ्यांना UAPA अंतर्गत अटक

पोलिसांनी सांगितले की, "मध्यरात्री अनेक ठिकाणी छापे टाकून ही अटक करण्यात आली. मुख्य आरोपीलाही अटक करण्यात आली आहे."

दैनिक गोमन्तक

दहशतवादी यासिन मलिकच्या शिक्षेच्या निषेधार्थ घोषणाबाजी आणि दगडफेक केल्याबद्दल काश्मीरमधील श्रीनगरमध्ये UAPA ( Unlawful Activities Prevention Act) अंतर्गत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर आणखी काही आरोपींची ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. मध्यरात्री पोलिसांनी ही अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासीन मलिकला शिक्षा सुनावण्यापूर्वी काल त्याच्या घराबाहेर दंगल, देशविरोधी/सांप्रदायिक घोषणा आणि गुंडगिरी करण्यात आरोपींचा सहभाग होता. पोलिसांनी सांगितले की, "मध्यरात्री अनेक ठिकाणी छापे टाकून ही अटक करण्यात आली. मुख्य आरोपीलाही अटक करण्यात आली आहे."

दरम्यान, श्रीनगरचे एसएसपी राकेश बलवाल यांनी सांगितले की, या संदर्भात मैसुमा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर क्रमांक 10/2022 अंतर्गत यूपीपीएच्या कलम 13 आर आयपीसीच्या कलम 120B, 147, 148, 149 आणि 336 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ते पुढे म्हणाले की, हिंसा भडकावणाऱ्यांवर सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल आणि त्यांना जम्मू-काश्मीरच्या बाहेर तुरुंगात ठेवले जाईल.

पोलिसांनी पुढे सांगितले, "श्रीनगरमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही." बुधवारी श्रीनगरच्या मैसुमा भागात यासिन मलिकचे समर्थक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली. टेरर फंडिंग प्रकरणात मलिकविरोधात न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी शहरातील अनेक भागात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला.

शिवाय, श्रीनगरच्या लाल चौक सिटी सेंटरपासून थोड्या अंतरावर असलेल्या मलिकच्या मैसुमा निवासस्थानी महिलांसह अनेक लोक जमले होते. यावेळी त्यांनी त्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी सुरक्षा दलांवर दगडफेकही केली. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. मात्र, कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT