संध्या भगत  Dainik Gomantak
ब्लॉग

मनात खूप सारे दाटून आलेले ...

वयाच्या सत्तरीत देखील संध्या भगत याना लिहावंसं वाटतं, अशासाठी की, मनात खूप सारे दाटून आलेले आहे. झटकन बदलून गेलेल्या या समाजाचे स्वरूप त्यांना अनाकलनीय झालेले आहे.

दैनिक गोमन्तक

माणसाना व्यक्त व्हावे असं का वाटतं? आपल्याला जाणवणारे टोचणारे लोकांना सांगावे असं का वाटतं? समाजात पूर्वीपासून जपत आलेली मूल्ये डोळ्यांदेखत अस्तंगत होत जातात तेव्हा जीवाची तगमग अधिकच असह्य होते. मग काहीतरी आवेगाने सांगण्याच्या प्रयत्नात पहिले शब्द कागदावरच उतरतात.

वयाच्या सत्तरीतदेखील संध्या भगत याना लिहावंसं वाटतं, अशासाठी की, मनात खूप सारे दाटून आलेले आहे. झटकन बदलून गेलेल्या या समाजाचे स्वरूप त्यांना अनाकलनीय झालेले आहे. त्या पट्टीच्या लेखिका नाहीत किंवा शब्दांवर प्रभुत्व असणाऱ्या कवयित्री नाहीत. पण त्यांना काहीतरी तळमळीने सांगावेसे वाटते, आपले मत मांडावे असे वाटते तेव्हा त्या ते सारे कागदावर मांडतात.

पोर्तुगीज काळात मुलींना घराबाहेर पाठवत नसत. नोकरी-धंद्याचा विचार तर सोडूनच द्या. अशावेळी संध्याला मराठी चौथीपर्यंत शिक्षण घेण्याची संधी मिळाली. वयाच्या सोळाव्या वर्षी संध्याचे लग्न स्वातंत्र्यसैनिक शिवदास भगत यांच्याशी झाले. त्यानंतर चूल, मूल, पतीची सेवा, घर सांभाळणं इतकेच तिच्या वाट्याला राहिले. नवरा व चार मुले मिळून एकूण सहा माणसं कुटुंबात होती. स्वातंत्र्यसैनिकांना दोनशे रुपये मानधन त्यावेळी मिळायचे. तिच्या घराजवळ थोडी मोकळी जागा होती तिथे तिने भाजीपाला लावला. तेवढीच घरासाठी मदत व्हावी म्हणून. लहानपणात मुलांवर चांगले संस्कार केले. अर्थात, त्याचा फायदा तिला आज पाहायला मिळतो, असं त्या सांगतात. मुलं लहान असताना घरखर्चाला हातभार लागावा म्हणून पाळणाघर चालवले. एक महिना ते पाच वर्षापर्यंतची मुले पाळणाघरात यायची. 1990 साली त्यांचा नवरा वारला. कोणत्याही प्रसंगाला न घाबरता समर्थपणे कसं तोंड द्यायचं हे त्या याप्रसंगीसुद्धा जाणून होत्या.

मागची अठरा वर्षे शांतादुर्गा महिला संघटनेचे, आधी सभासद व नंतर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. अजूनही करतात. त्या रोज वर्तमानपत्रात वाचतात व त्यातील ठळक बातम्यांवर विचार करतात. त्यातून त्याना लिहिण्यासाठी विषय मिळतात. रोज नवीन नवीन प्रश्न सापडतात व लगेच ती त्यावर लिहिते. ती हे लिखाण प्रसिद्धीसाठी लिहित नाही, फक्त स्वत:ला अभिव्यक्त व्हावे म्हणून आणि आपली आवड म्हणून लिहिते.

त्यांच्या महिला संघटनेत त्या आपले लिखाण वाचून दाखवतात. त्या सांगतात, संघटनेमध्ये महिलांना राजकीय प्रश्नावर जागृत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्या आपल्यापरीने लेख, कविता, नाटक यांच्या माध्यमातून राज्याच्या, देशाच्या राजकीय आणि सामाजिक प्रश्नावर लिहितात. त्यांच्या लेखात मुख्यतः कोकणी मराठी वाद, पूर्वीचा गोवा-आताचा गोवा, गोव्याचे गाजलेले महानंदू प्रकरण, नोकरीचा व्यापार, निवडणूक, पक्षांतर, कोरोना काळातली औषधांची टंचाई इत्यादी विषय असतात.

मराठी चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या संध्याताई सांगतात, समाजसेवा करण्यासाठी ना शिक्षणाची गरज असते, ना वयाचे बंधन असते. असते ती फक्त तीव्र इच्छाशक्ती. या वयातदेखील त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रचंड उत्साही आहे. त्याना नेहमी नीटनेटके राहणे आवडते. लहानपणापासून दुसऱ्यांना मदत करायची हे शिक्षण त्याना घरातूनच मिळालेले आहे. जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा त्या चार दिवसांपूर्वी गाजणाऱ्या राज्यपाल सत्यपाल मलिक प्रकरणावर कविता लिहित होत्या.

- भारती बांदोडकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT