लिमिटस
लिमिटस  Dainik Gomantak
ब्लॉग

IFFI 2021: त्यांना योग्य सन्मान कधी मिळेल?

दैनिक गोमन्तक

इफ्फीमधला (IFFI) गोवा विभाग मोठ्या मिनतवारीने एकदाचा जाहीर झाला. एक पूर्ण लांबीचा चित्रपट ‘डिकॉस्टा हाऊस’ (कोकणी) आणि कुपांचो दर्यो (कोंकणी), गगन (कोकणी), पॉल १० (कोंकणी) आणि लिमिटस (मराठी) हे चार लघुपट या विभागात असतील. सुरुवातीलाच योग्य तऱ्हेने हा विभाग जाहीर झाला असता तर आणखीन लघुपटांच्या प्रवेशिका या विभागात नक्कीच आल्या असता. इफ्फी (IFFI) मधला ‘गोवा विभाग’ म्हणजे राजकीय दबावाचे एक माध्यम बनले आहे. पण या चुकीची सुरुवात गोवा मनोरंजन संस्थेकडूनच झाली. या संस्थेच्या प्रशासकीय विभागाकडून संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाईना सल्ला देण्यात आला. ‘‘सर, ह्या वर्सा कोणीच फिल्मा करुंक ना. किद्याक जाय ते सेक्शन?’’ या शब्दांत आणि दुर्देव म्हणजे प्रशासनीक काम म्हणजे फक्त इफ्फीचे (IFFI) ऑडिट सांभाळणे असा समज करून बसलेल्या उपाध्यक्षांनी या प्रशासनिक विभागाचा सल्ला गप्प राहून मानला.

पॉल 10

ह्या विभागातले चित्रपट जाहीर झाले आहेत खरे पण अजून ते कधी दाखवले जातील, निर्मात्या संस्थांसाठी किती निमंत्रणपत्रिका असतील, त्या केव्हा जातील, दिग्दर्शक किंवा निर्मात्याचा योग्य सन्मान राखला जाईल की नाही याबद्दल कुणालाच काही माहिती नाही हा ‘गोवा विभाग’ एरवीही गोवा मनोरंजन संस्थेच्या खिजगणतीत नसतो. या विभागासाठी संस्थेतील एखादी जबाबदार व्यक्ती नेमून या विभागातल्या चित्रपटांचे प्रदर्शन, निर्मात्यांचा योग्य सन्मान राखून सुरळीतपणे पार पडेल, असे पाहणे आवश्यक आहे. पण सहसा असे होत नाही खरं तर महोत्सवासाठी आलेले हाताच्या बोटांवर मोजले जातील इतके प्रतिनिधीदेखील ह्या विभागातले चित्रपट पहायला फिरकत नाहीत तेव्हा गोवा विभागात निवडलेल्या चित्रपटाच्या निर्मात्यांनाच त्यांचे प्रेक्षक येतील इतक्या प्रवेशिका द्यायला काय हरकत आहे? या विभागाचे महत्व गोवा मनोरंजन संस्थेला अजून कळले नसले तरी गोमंतकीय चित्रपट दिग्दर्शकांचे काही उत्कृष्ट चित्रपट या विभागात झळकले आहेत. त्यातल्या काही चित्रपटांना तर देशातल्या अन्य महत्वाच्या महोत्सवातूनही स्थान लाभलेले आहे, राष्ट्रीय पुरस्कारही लाभलेला आहे. पण गोव्यात चित्रपट संस्कृती रुजवण्याच्या फुकाच्या वल्गना करणाऱ्या या संस्थेच्या धुरीणांनी गोवा विभागाची नेहमीच उपेक्षा केली आहे.

एकतर गोव्यातील (Goa) चित्रपट निर्मात्यांना हुरूप येईल असे कुठलेच उपक्रम गेल्या पाच सहा वर्षात गोवा मनोरंजन संस्थेकडून आखले गेलेले नाही. उलट जे निर्माते - दिग्दर्शक स्वबळावर स्वतःचे पैसे खर्च करुन चित्रपट बनवताहेत त्यांचा अवसानघात मात्र केला आहे. गोमंतकीय चित्रपट क्षेत्रातली ही धडपडी मंडळीच संस्कृतीची खरी वाहक आहेत. गोवा मनोरंजन संस्थेच्या घोर उपेक्षेनंतर निदान हे पाच चित्रपट तरी या विभागात आलेले आहेत. त्यांचा योग्य सन्मान राखला जायलाच हवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT