art gallery Dainik Gomantak
ब्लॉग

काय आहे हा चहाचा कप?

वियोला रॉड्रिग्जने कलाक्षेत्रात काम करायला लहानपणीच सुरुवात केली होती.

दैनिक गोमन्तक

वियोला तिच्या आर्ट गॅलरीचे वर्णन, ‘प्रत्येकासाठी चहाचा एक गरम कप’ असाच करते. काय आहे हा चहाचा कप? तिच्या गॅलरीत विविध शैलींची अमूर्त, समकालीन वगैरे चित्रे आहेत. त्याव्यतिरिक्त तिच्या गॅलरीतले चित्रकार ‘वॉक-इन’ ग्राहकांचे पोर्ट्रेट किंवा त्यांना हवे तसे वैयक्तिक पेंटिंगही करू शकतात. तिच्या कला गॅलरीत प्रत्येकाला आनंदीत करणार्या कलाकृती आहेत.

वियोला रॉड्रिग्जने कलाक्षेत्रात काम करायला लहानपणीच सुरुवात केली होती. नंतर ‘गोवा कॉलेज ऑफ आर्ट’मधून तिने चित्रकलेचे औपचारिक शिक्षणही पूर्ण केले. आता तिने या क्षेत्रात स्वतःला एक ‘ब्रँड’ म्हणून स्थापित केले आहे. ‘वोला आर्ट इस्केप’ची ती संचालक आणि समन्वयक आहे. विशेष म्हणजे आपल्या वयाच्या पाचव्या वर्षी तिने या क्षेत्रात पाय रोवताना, स्केचिंग, डुडलींग, पेंटिंग वगैरे सर्व माध्यमातून कला आणि रंगांबद्दल मूलभूत गोष्टी शिकण्यास सुरुवात केली होती. तिच्या वडिलांनी- व्हर्नन रॉड्रिक्स यांनी, तिची चित्रकलेची आवड आणि कौशल्य पाहिले आणि तिला याच क्षेत्रात करियर करण्यास प्रोत्साहन दिले. ‘माझे पालक नेहमी मोकळ्या मनाचे आणि उत्तेजन देणारे होते. त्यांनी मला माझ्या आवडीचे पालन करण्यास नेहमीच पाठबळ दिले.’ असेच वियोला त्यांच्याबद्दल बोलताना म्हणते.

चित्रकलेच्या प्रेमाने तिने ‘वोला आर्ट इस्केप’ ही स्वतःची आर्ट गॅलरी पर्वरी येथे उघडली. त्यानंतर ती कांदोळी येथे हलवण्यात आली. ही तिची आर्ट गॅलरी (art gallery) आता अनेक होतकरू चित्रकारांसाठी आणि कलाप्रेमींसाठी आवडीची जागा बनली आहे. गॅलरीत असलेल्या कलाकृतींव्यतिरिक्त वियोला पोर्ट्रेट, शिल्प आणि म्युरल या माध्यमातून देखील काम करते. कलाकृतीत नेमके तपशील उतरावे यासाठी ती आपल्या क्लायंटकडून, त्यांचे प्राधान्य आणि अभिरुची समजून घ्यायचा कसोशीने प्रयत्न करते.

या कोरोनाकाळातही (Corona) वियोलाने आपल्या हजारांवर कलाकृती भारत, मध्यपूर्व देश आणि युरोपमधील आपल्या खरेदीदारांना विकल्या आहेत. अनेक प्रतिष्ठित हॉटेलसाठी तिने म्युरल्स बनवली आहेत ज्यात ताज, हयात अशा पंचतारांकित हॉटेलांचाही समावेश आहे. गोव्यातही अनेक चित्र संग्रहकांकडे वियोलाच्या चित्रकृती आहेत. एका नामांकित अस्थापनासाठी तिने गोव्यात वेगवेगळ्या शंभर जागांवर, शंभर वॉल म्युरल्स तीस दिवसात पूर्ण केली. हे खूप मोठे आव्हान वियोलाने स्वीकारले होते आणि तिने ते यशस्वीरीत्या पूर्णही केले.

स्वतः एक प्रस्थापित कलाकार असूनसुद्धा अनेक नवोदित कलाकारांना मदत करायला व त्यांना पाठबळ द्यायला ती नेहमीच पुढे असते. तिची आर्ट गॅलरी चित्रकला शिकण्यासाठी आणि स्वतःला विकसित करण्यासाठी तयार असलेल्या कलाकारांना इंटर्नशिप प्रदान करून त्यांना मदत करते. त्याशिवाय नवोदित कलाकारांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कला स्पर्धाही आयोजित करते. वियोलाच्या वैयक्तिक आवडीबद्दल म्हणाल, तर तिला स्वतःला ऍक्रेलिक आणि ऑइलपेंट ही माध्यमे आवडतात. तिला अमूर्त आणि समकालीन चित्र-कलाकृतींबरोबरच ‘रेनासान्स’ काळातली चित्रेही प्रभावित करतात. लिओनार्दो दा विंची आणि मायकल अँजेलो या श्रेष्ठ चित्रकारांना ती आपला आदर्श मानते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT