विनोदी जोशी. Dainik Gomantak
ब्लॉग

सगळ्यांना जागवणारी वासुदेवाची ही स्वारी गोव्यात

गोव्यात (Goa) क्वचित दिसणारे वासुदेव दक्षिण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसतात.

दैनिक गोमन्तक

‘वासुदेव आला हो वासुदेव आला रामाच्या पारी हरिनाम बोला....’सगळ्यांना जागवणारी वासुदेवाची ही स्वारी गोव्यात, दाबोळी विमानतळाच्या परिसरात भेटली. नाव विनोदी जोशी. मुक्काम, मौजे कोल्हापूर. वय, पन्नाशीच्या आसपास. डोक्यावर मोरपिसांची निमुळती होत गेलेली उंच मुकुटाकार टोपी, अंगात घोळदार अंगरखा, गळ्यातून दोन्ही बाजूला सोडलेला शेला, कपाळी चंदनाचा टिळा, गळ्यात कवड्यांच्या व रुद्राक्षांच्या माळा, हाती टाळ आणि मुखी वासुदेवाचे गाणे- ‘हरिनाम बोला....’

वासुदेव (Vasudev) हा लोक संस्कृतीतला लोककलाकार आणि घरोघरी फिरून वासुदेवाची गाणी गात गात देवाच्या नावानं दान मागणारा भिक्षुक. यांना ‘धुकोट’ असेही म्हणतात. गोव्यात (Goa) क्वचित दिसणारे वासुदेव दक्षिण महाराष्ट्रात (Maharashtra) मोठ्या प्रमाणात दिसतात. गावोगावी आणि शहरातही हिंडून दान मागून ते आपला उदरनिर्वाह करतात तर काहीजण शेतीवाडी करून मिळेल त्या वेळेत वासुदेव संस्कृती सांभाळतात. घरातला एखादा मुलगा भिक्षादान मागण्याजोगा झाला की त्याला भिक्षादान मागण्याची विधिपूर्वक दीक्षा दिली जाते. एखादा शुभ दिवस पाहून ग्रामपुरोहित याला घरी बोलावतात. पुरोहित मुलाला वासुदेवाचा वेश परिधान करायला सांगतो आणि मंत्रोच्चारपूर्वक त्याच्या कपाळी चंदनाचा टिळा लावून त्याला वासुदेवाची दीक्षा देतो. याप्रसंगी पुरोहिताला मानाचा विडा, दक्षिणा तसेच ज्ञाती बांधवांना भोजन देण्याची प्रथा आहे.

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) वासुदेव संस्कृती (Culture) केव्हा व कशी उदय पावली हे निश्चित सांगता येत नाही. तथापि ती हजार-बाराशे वर्षांनी ती जुनी असावी. ज्ञानदेव, नामदेव आदी अनेक संतांच्या वांग्मयामध्ये वासुदेवावरील रूपके आढळतात. महानुभाव वांग्मयामध्येही त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे सापडतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात वासुदेवाची शान होती. गावोगावी दान मागण्याच्या उद्देशाने फिरणारे वासुदेव, त्यांना शत्रूच्या गोटात गोटातील गुप्त माहिती कळवत. श्रीकृष्णाशी आपले सांस्कृतिक नाते मानून वासुदेव घरोघरी फिरून जनजागृतीचा समाज प्रबोधनाचे कार्य करतात. वासुदेवाचे एक पारंपारिक गाणं असं आहे....

‘गोविंदा रामा हो, गोपाळा रामा जी.. जीश्रीकृष्ण सोंगाड्याचे आम्ही बाळ-बागडे जी....जी.... वासुदेवाची गाणी विविध प्रकारची आहेत. त्यात बाळकृष्णाचे जसे चरित्र येते तसा निखळ भक्तीमहिमाही गायला जातो. त्यात प्रपंचाचे वर्णन येते. जनजीवन, संसार नीटनेटका करण्यासाठी नीतीने वागण्याची रीत सांगितली जाते. सरळ सोप्या सुबोध भाषेत जीवनाचे व वेदाचे सार सांगितले जाते. माया-मोहाच्या जंजाळात अडकून पडलेल्या माणसाला जागं करण्याचं कार्य करण्याचं साधुसंतांनी केलं, तेच कार्य आजही गावोगावी फिरून वासुदेव करतात.

‘वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पाराला हरिनाम बोला

घे घे घे हरिनाम घे, माया मोह सोडून दे

मानव जातीला जन्माला आला, संसार त्याला खाई

माणूस मेला की त्याचं गावाबाहेर घर....

सारा संसार मायेचा कुणी नाही रे कुणाचे

शेवटी जाणे एकटे काय म्हणशील माझे माझे

सारा माहेरचा बाजार, हरिनाम बोला.....’

कोणी दान दिलं की ते झोळीत घेतात आनंदाने म्हणतो-

‘दान पावलं दान पावलं पांडुरंगाला

माझ्या देवाला दान पावलं....’

आणि मग दान देणाऱ्या यांच्या कपाळी बुक्का लावून त्याला आशीर्वाद देताना,

‘आनंदी आनंद होणार आहे,

बघा सुखी होणार सगळे,

वासुदेवाचे सांगणे....’ असं गीत वासुदेव गातात.

असा हा वासुदेव, ‘वासुदेव’ संस्कृती जतन करत, जनजागरण जागृती करत, चारी कुळांचा उद्धार गात गावोगावी फिरतो. कुणाकडे अधिक काही दान मागत नाही. स्वखुषीने जे काही कुणी देतील तेवढे स्वीकारतो. कोणाच्याही घरी मुक्काम करत नाही.

सध्या हा वासुदेव मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) निमित्ताने गोव्यात (Goa) आला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचे (Corona) भय त्यालाही आहे. त्याच्या मुखी हरिनाम आणि मुखावर मुखपट्टीपण आहे. कोरोनाविषयी जनजागृती तो नकळतपणे आपल्या कृतीतून आणि गाण्यातूनही करतो-

‘वासुदेव सांगतोय जगा

वासुदेव घ्या हो करून सखा

तुम्हास नाही होणार धोका….’

- नारायण महाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

SCROLL FOR NEXT