Goa Journey Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Journey: म्हणून प्रत्येक पर्यटक म्हणतो मी गोव्याच्या प्रेमात पडतो

गोव्यात अशी काही ठिकाणे आहेत जिथे जावून तुम्ही कोरोना नियमांचे पालन करून एंजॉय करू शकता

Priyanka Deshmukh

कोरोना महामारिचा कहर अजून संपलेला नाही. हळूहळू रूग्णसंक्या कमी होते आहे. पण पुर्णत: कोरोना गेला अस आपण म्हणू शकत नाही. पण निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याने नागरिकांना जरा दिलासा मिळाला आहे.

असे बरेच पर्याय आहेत जिथे आपण सुरक्षितपणे आपण एंजॉय करू शकतो. आणि पर्यटन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो गोवा. तेव्हा गोव्यात अशी काही ठिकाणे आहेत जिथे जावून तुम्ही कोरोना नियमांचे पालन करून एंजॉय करू शकता.

1. चोराओ (Chorao)

म्हादाई नदीकाठी चोराओ नावाचे एक बेट आहे, चोराओ हे सलीम अली पक्ष्यांचे घर आहे. या बेटाच्या बाजूला असलेल्या शहरात तुरळक लोकसंख्या आहे, तेव्हा आपण या शहरातून सायकल स्वारीही करू शकतो.

2. कॅमुर्लिम (Camurlim)

चापोरा नदीकाठी वसलेले कॅमुर्लिम हे एक नयनरम्य गाव आहे, भातशेती, नदीकिनारी व्हिला आणि होमस्टे त्याचबरोबर आजूबाजूला विविद प्रकराचे वनस्पती आणि प्राणी आहेत. बोट-राइड करतांना नदीकिनारी नयनरम्य सूर्यास्त बघतांना तुम्ही गोवाचे स्थानिक मद्य फेनीचाही आनंद घेऊ शकता.

3. दिवार बेट (Divar Island)

ऐतिहासिकदृष्ट्या लक्षणीय असे हे बेट आहे. दिवार हे म्हादाई नदीच्या काठावरील एक दुर्गम बेट आहे. ज्याचा एक इतिहास आहे. या ठिकाणी बऱ्याच प्राचीन चर्चचे अवशेष सापडले आहेत.

4. राणेचे झुएम (Raneache Zuem)

गोव्यातील हे सर्वात लहान बेट आहे, राणेचे झुएम सुसेगड गोवा च्या जीवनशैलीचे दर्शन घडवते. या ठिकाणी बॅकवॉटर ला जावून क्षणभर विश्रांती घेता येते. खूप कमी लोकवस्ती असलेल्या या बेटावर निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो.

5. व्हॅन्क्सिम बेट (Vanxim Island)

वॅन्क्सिम ही फक्त 300 लोकांची लोकसंख्या असलेले गोव्यातील एक दुर्गम ठिकाण आहे. ज्यांना शहरी जीवनापासून आणि गर्दीच्या वातावरणापासून दूर जायचे आहे त्यांच्यासाठी व्हॅन्क्सिम हा एक परफेक्ट पर्याय आहे.

6. माड्डीतळप पठार

लोलये पंचायत क्षेत्रात जैवविविधतेने संपन्न अनेक पठारे आहेत त्यापैकीच माड्डीतळप पठार आहे.या पंचायत क्षेत्रातील भगवती पठार असेच जैवविविधतेने समृद्ध आहे. माड्डीतळप पठारावर वृक्षवल्ली त्याचप्रमाणे प‌शुपक्षी, सरपटणारे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे बेडूक,किटक,किटक भक्ष्यीय वनस्पती या जैवविविधतेने समृद्ध आहे. माड्डीतळप पठार सद्या सीतेची आसवे या वनस्पतीने बहरले आहे. या पठारावर मोठ्या प्रमाणात बेडकाची उपज होते मात्र पहिल्या पावसात चिपींग चिकनसाठी या पठारावर बेडकांची शिकार केली जाते.गोव्यातील घुमटासाठी वापरण्यात घोरपडीचे चामडे वापरण्यात येते अशा पठारावरच घोरपडीचे निवासस्थान असते.

माड्डीतळप पठार

6. साओ जॅसिंटो बेट (Sao Jacinto Island)

गोव्यातील मुख्य बेटांपैकी एक असलेलं साओ जॅसिंटो बेट. गोव्याच्या मार्गावर असलेल्या या बेटावर निसर्गाने हिरवे कवच दिले आहे, असं म्हणायला हरकत नाही. या बेटाचे जतन तेथिल स्थानिकांनी केले आहे. आर्किटेक्चरमध्ये रस असणाऱ्यांना या बेटावर जुन्या पोर्तुगीज शैलीचे व्हिला, घरे आणि चर्च बघायला मिळतील.

7. नेत्रावळी (Netravali)

नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य जे गोव्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे, राष्ट्रीय उद्यानाची सहल करण्यासाठी पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. या ठिकाणी खुप सुंदर धबधबे आहेत. शांत वस्ती आहे जिथे कोणीही फिरायला जाऊ शकतं. आणि विशेष म्हणजे येथिल स्थानिक भोडनाचा आस्वाद आपण घेऊ शकतो.

8. बटरफ्लाय बीच (Butterfly Beach)

माणूस स्वतःचा परिसर व जीवनाधार नष्ट करून स्वतःलाच अडचणीत आणत आहे. जीवनसृष्टीचा पृथ्वीवरील कालखंड म्हणजे दिवसाचे 24 तास मानले तर माणसाची आतार्यंतची कारवाई शेवटच्या एखाद्या मिनिटाची. तुम्हाला आयुष्याचा सर्वोत्तम अनुभव घ्यायचा असेल तर दक्षिण गोव्यातील सुंदर बटरफ्लाय बीचला नक्कीच भेट द्या. या बीच वर विविध प्रजातीचे फुलपाखरं पाहायला मिळतील. फुलपाखरांमुळेच या बीचचे नाव 'बटरफ्लाय बीच' असे पडले आहे. गोव्यातील हा प्रसिद्ध बीच 'हनिमून बीच' म्हणून देखील ओळखला जातो.

Butterfly Beach in goa

9. मोल्लेम (Mollem)

गोव्याचे ग्रीन हार्ट म्हणून ओळखले जाणारे, मोलेम नावाचे राष्ट्रीय उद्यान आहे. या गावाला जैवविविधतेचे वरदान लाभले आहे. या ठिकाणी भरपूर वन्यजीवांचे घर आहे आणि प्रसिद्ध दूधसागर धबधबा देखील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT