Goa Elections: भाजपमध्‍ये सुंदोपसुंदीचा धोका Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Elections: भाजपमध्‍ये सुंदोपसुंदीचा धोका

मगो पक्षाने केलेय पाऊसकरांना टार्गेट, इतर पक्षांचा पत्ताच नाही

दैनिक गोमन्तक

फोंडा: सावर्डे मतदारसंघात येत्या विधानसभा निवडणुकीत भलतीच चुरस दिसणार आहे. यावेळेला खुद्द सत्ताधारी भारतीय जनता पक्षात सुंदोपसुंदी होण्याचा धोका असून भाजपच्या आजी-माजी आमदारांनी उमेदवारीवर दावा केला आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर स्वीकारेन असे पालुपद इच्छुकांकडून घोळवले जात आहे, मात्र अंतर्गतरीत्या इच्छुक उमेदवारांनी आपापल्यापरीने प्रचारकार्यावर भर दिला आहे.

सावर्डे मतदारसंघावर तसे यापूर्वी मगो पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघावर बऱ्यापैकी जम बसवला आहे. मात्र गेल्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपवर मात करीत मगोने आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले होते. दरम्यानच्या काळात राजकीय घडामोडी होऊन विद्यमान आमदार दीपक प्रभू पाऊसकर हे मगो पक्षातून भाजपमध्ये गेल्याने आता मगो पक्षाने पुन्हा एकदा या मतदारसंघात कंबर कसली आहे.

भाजप आणि मगो सोडल्यास अन्य कुठल्याही पक्षाचा वरचष्मा या मतदारसंघात नाही. काँग्रेस पक्षात तर सगळा आनंदीआनंद असून आताही या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चमत्कार साधता आला तर ठीक अन्यथा मगो आणि भाजपमध्येच थेट लढत होणार आहे. या मतदारसंघात अपक्ष आमदार म्हणून अनील साळगावकर यांनी आपला करिष्मा दाखवला होता. पण साळगावकर यांना जे जमले नाही.

मगो पक्षाच्या उमेदवारी दीपक प्रभू पाऊसकर हे निवडून आले होते. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मतदारसंघात मगो पक्षाला उमेदवाराची गरज होती. गेल्या निवडणुकीत दीपक प्रभू पाऊसकर यांचे खंदे समर्थक असलेले धारबांदोडा पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच विनायक गावस यांना मगो पक्षाने प्रवेश दिला असून त्यांना पक्षाने उमेदवार म्हणून पुढे आणले आहे. सध्या मगो पक्ष सत्तेत नसला तरी या पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांचा या मतदारसंघात जनसंपर्क दांडगा असल्याने त्याचा लाभ गावस यांना होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला किर्लपाल-दाभाळ येथील रमाकांत गावकरही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, त्यामुळे खाण भागातील व्यावसायिकच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार असून त्यातून कुणाला संधी मिळते ते पाहावे लागेल.

रोजगाराचा प्रश्‍न ऐरणीवर

सावर्डे मतदारसंघ हा अर्धा वनराईने नटलेला तर अर्धा खाण भागाने व्यापलेला प्रदेश आहे. या मतदारसंघात खाण उद्योग हा प्रमुख व्यवसाय बनल्याने अनेक लोक या उद्योगाशी निगडित आहेत. मात्र खाणी बंद पडल्यामुळे आता लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आतापर्यंत खनिज मालाचा लिलाव तसेच स्वामित्व धन अदा केलेल्या खनिज मालाची वाहतूक करण्यात आली. त्यातून थोडेबहुत काम मिळाले, पण ते कायमस्वरुपी नसल्याने खाणी पुन्हा सुरू करा अशी जोरदार मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. बेरोजगारी ही या मतदारसंघाची प्रमुख समस्या बनली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीसाठी प्रचाराचा मुख्य मुद्दा रोजगारच होणार आहे. मतदारसंघातील बहुतांश जागा ही वनाच्छादित असल्याने वन खात्याशी संबंधित दावे अजून पडून आहेत. रेल्वे दुपदरीकरण, तम्‍नार वीज प्रकल्प हे मुद्देही निवडणुकीत पुढे येणार आहेत.

शर्यतीत कोण?

भाजपचे विनय तेंडुलकर यांनी दोनवेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. यावेळेला भाजपतर्फे आमदार दीपक प्रभू पाऊसकर, माजी आमदार गणेश गावकर तसेच माजी आमदार व विद्यमान राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर हे तिघेही उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. पण उमेदवारी कुणाला मिळणार हे गुलदस्त्यात आहे.

पर्यटनाला मोठा वाव, पण...

सावर्डे मतदारसंघ हा केवळ खाणव्याप्त भाग नव्हे, तर पर्यटनाला पूरक असे वातावरण आणि नैसर्गिक साधनसुविधाही या मतदारसंघात आहेत. येथील रगाडा दूधसागर सारखे अखंड जलस्त्रोताने भरलेले जलकुंभ हे या मतदारसंघाचे खरे सौंदर्य आहे. दूधसागरचे पर्यटन फेसाळता धबधबा जसा देशी विदेशी पर्यटकांवर मोहिनी घालतो त्याचप्रमाणे तांबडी सुर्ल येथील आखीव रेखीव श्री महादेवाचे मंदिर हा स्थापत्य कलेचा उत्कृष्ट असा नमुना आहे. त्यामुळे या सुबक सुंदर महादेव मंदिराला भेट देणाऱ्या परमेश्वराचे दर्शन आणि जोडीला मनमोहित करणारा निसर्ग आल्हाददायक वातावरण यामुळे हा परिसर देशी विदेशी पर्यटकासाठी अपूर्व अशी पर्वणी ठरली आहे. सध्या खाणी बंद आहेत त्यामुळे या मतदार संघातील ग्रामीण पर्यटन अधिक फुलवण्याचा प्रयत्न व्हायला हवा.

खाणींसाठी हवेत प्रयत्न

राज्याचा आर्थिक कणा मानलेल्या खनिज खाणींचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. बंद खाणी पुन्हा सुरु करण्यासाठी सरकारकडून भगिरथ प्रयत्न व्हायला हवेत. राज्य सरकारकडून पाणपुरा वा होत असला तरी केंद्राकइन हवा तसा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे बंद खाणींमुळे रोजगारावर विपरित परिणाम झाला आहे. अन्य रोजगार नसल्यामुळे या मतदारसंघातील बहुतांश लोकांनी खाणीशी संबंधित रोजगार स्‍वीकारला. जोपर्यंत खाणी व्यवस्थित सुरू होत्‍या तेव्‍हा येथील लोकांना फरक पडला नाही, पण आता खाणीच बंद झाल्याने बेरोजगारीचा प्रश्न प्रकर्षाने समोर आला आहे.

पाऊसकरही सक्रिय

दीपक प्रभू पाऊसकर यांना सुरवातीला साधन सुविधा विकास महामंडळासारखे बडे महामंडळ मिळाले. या महामंडळाच्या आधारे त्यांनी मतदारसंघात अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री बनल्यानंतर त्यांनी विकास कामांवर भर दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT