Goa School  संदीप देसाई
ब्लॉग

स्कूल चले हम : गोव्यातील विद्यामंदिरे गजबजली!

काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे ओवाळून स्वागत केले, अन् अखेर अध्ययन, अध्यापन सुरू झाले.

दैनिक गोमन्तक

दोन वर्षांनंतर सोमवारी शाळा सुरू झाल्या. विद्यार्थी वर्गांने आनंदाने शाळेत प्रवेश केला. पहिली, दुसरी, पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांसह काही नव्या विद्यार्थ्यांनीही आगळा-वेगळा पहिला दिवस अनुभवला. एसओपीच्या पालनानुसार वर्ग झाले, विद्यार्थी-शिक्षकांची ओळख परेडही झाली. सगळीकडे आनंदी वातावरण होते. काहींनी शाळेच्या गणवेषाशिवाय रंगीत कपड्यातून वर्गात प्रवेश केला. काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे ओवाळून स्वागत केले, अन् अखेर अध्ययन, अध्यापन सुरू झाले. (Schools reopened on Monday after two years in goa)

सरकारच्या (Goa Government) निर्णयानुसार अखेर आजपासून (सोमवारी) शाळांची घंटा वाजली असून, पहिल्याच दिवशी डिचोली शहरातील शाळांनी गजबजाट दिसून आला. सरकारच्या मार्गदर्शक नियमांचे पालन करून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या प्रत्यक्ष वर्गाना सुरुवात झाली आहे. डिचोली शहरासह ग्रामीण भागातील शाळांनीही पहिल्याच दिवशी समाधानकारक प्रतिसाद मिळाला. बहुतेक विद्यार्थ्यांना शाळेत (Goa School) सोडण्यासाठी त्यांचे पालक सोबत आले होते. दुपारी शाळा सुटण्याच्यावेळी आपल्या पाल्यांना नेण्यासाठी काही शाळांसमोर पालकांची गर्दी उसळली होती. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने सकाळी आणि दुपारी शाळांजवळ काहीसे गडबड आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ''कोविड'' महामारीनंतर जवळपास पावणे दोन वर्षानंतर शाळा सुरू झाल्याने बहुतेक विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर भलताच उत्साह दिसून येत होता.

सहकार्याची अपेक्षा

शहरातील शांतादुर्गा विद्यालयात विद्यार्थ्यांची पटसंख्या मोठी आहे. या शाळेत वेळोवेळी सॅनिटायझेशन करताना मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येणार आहे, असे शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयाच्या सहमुख्याध्यापिका यास्मिन शेट यांनी सांगून पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

पेडणेत शाळांतून उत्सवी वातावरण

तब्बल दोन वर्षे बंद असलेल्या सरकारी प्राथमिक शाळा प्रथमच आज सोमवार २१ फेब्रुवारीपासून शिक्षण खात्याच्या अध्यादेशाने सुरुवात झाल्या आणि पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांत आनंदाला उधाण आल्याचे चित्र पेडणे तालुक्यातील अनेक शाळांत दिसून आले. पालक-शिक्षकांनी शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या मुलांचे स्वागत आरती ओवाळून, कुंकू लावून व फुले उधळून अगदी अभिनव पद्धतीने केले. सगळ्या शाळा फुले, पताका, फुगे वगैरे लावून सजवल्या होत्या. यामुळे एखादा मोठा उत्सवच होता.

पेडण्यातील काही सरकारी प्राथमिक शाळांनी अगदी अभिनव पद्धतीने आपल्या मुलांचे आज शाळेच्या पहिल्या दिवशी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. त्यासाठी शनिवारपर्यंत शाळेतील बाकडे, खुर्च्या, टेबल व इमारतीचे सॅनिटायझेशन, साफसफाई करून घेतली. मुलांच्या स्वागतासाठी शाळेच्या इमारतीला वेगवेगळ्या पद्धतीने सुशोभित करून विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना ओवाळून, गुलाब पुष्प देऊन, शालेय वस्तू भेट देऊन मुलांचे स्वागत केले.

आज पहिल्या दिवशी मुलांत, पालकांत आणि शिक्षक वर्गात मोठा उत्साह दिसत होता. शिक्षण खात्याच्या नियमाप्रमाणे मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे मान्यता पत्र घेणे अनिवार्य असले तरी आज पालकांमध्ये इतका उत्साह दिसत होता, की पालकांचे मान्यता पत्र घेण्याची गरज आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत होता.

वर्गमित्रांची भेट : यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली आणि इयत्ता पाचवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस नवीनच ठरला होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांशी जुळवून घेणे काहीसे अवघड बनले होते. दोन वर्षांच्या कालावधीनंतर वर्गमित्रांची भेट झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

SCROLL FOR NEXT