Alambi Dainik Gomantak
ब्लॉग

रानात उगवणारी अळंबी बनतेय रोजगाराचं साधन

अळंबी आणि पावसाळ्यात ओलेत्या आडरानी रुजून आलेल्या अळंबी या दोन्हीमधले साधर्म्य ओळखण्याचा चाणाक्षपणा गोमंतकीयांत आहेच.

गोमन्तक डिजिटल टीम

अळंबीचे दिवस आले. अर्थात अळंबी वेगवेगळ्या जाती-प्रजातीच्या असल्यामुळे कुठल्या अळंबीचे दिवस आले हे इतरत्र स्पष्ट करणे आवश्यक असले तरी गोमंतकीयांसाठी ती गोष्ट गरजेची नाही. निवडणुका आल्या की वेगवेगळ्या प्रकारच्या अळंबी भुईला भार होऊन सारीकडे रुजून येतात. त्या अळंबी आणि पावसाळ्यात ओलेत्या आडरानी रुजून आलेल्या अळंबी या दोन्हीमधले साधर्म्य ओळखण्याचा चाणाक्षपणा गोमंतकीयांत आहेच.

(एकीकडे) ‘सत्ता’ आणि (दुसरीकडे) ‘स्वाद’ यांचा उपभोग घेण्यासाठी कायदा आणि नैतिकता या दोन्हींना बगल कशी द्यावी हे त्यांनी चांगलेच ओळखले आहे. जंगलात रुजून आलेल्या अळंबी तोडण्यास कायदेशीर बंदी आहे पण देवभिरूपणा आणि कायदा कितपत पाळावा याची शिकवण नेतेमंडळीं गोमंतकीयांना दर निवडणुकीच्या निमित्ताने देतच आले आहेत.

त्यामुळे एखाद्या सातेरीचा (रोईणीचा) आशीर्वाद घेऊन कोणी सामान्य माणसाने त्या तोडल्या तर ‘कायदा मोडला’ असा आरडाओरडा करण्यासारखे त्यात काही नाही. ‘मी देवभक्त आहे व देवाची परवानगी मी घेतली आहे.’ असा मुलामा संभावितपणे दिला की सगळ्या अळंबी पदरात पवित्र होतात.

श्रावणात म्हणे अळंबी हा माशांना चांगला पर्याय असतो. काही झाले तरी जिभेचे चोचले पुरवण्यात कमी होता कामा नये. पाप-पुण्यामधले अंतर मासे आणि अळंबी यात शोधण्याची कल्पकता दाखवणाऱ्या माणसाला सहस्त्र प्रणाम अवश्य लागू होतात. दुर्दैवाने यावेळी अधिक महिना आल्याने श्रावण बराच पुढे ढकलला गेला आहे. तोपर्यंत अळंबी बाजारात, पर्यायाने रानात राहायला हव्यात.

बाजारात तशा कृत्रिमरित्या उत्पादित केलेल्या आळंबी (बटन मशरूम किंवा ऑईस्टर) वर्षभर असतातच पण पावसाबरोबर भुईत रुजून आलेल्या, तेल अळमी किंवा शितोळ अळमी अशा वेगवेगळ्या जातीच्या खाण्यालायक अळंबीबरोबर त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. बोटभर आकाराच्या 20-2५ अळंबीना ५00 (आकडा कमी टाकला आहे म्हणता?) रुपयांचे मोल देऊन हौस भागवणे फक्त गोवेकरांनाच शक्य होते. वाटे घालून बसलेल्या अळंबीच्या रोखठोक विक्रेतीसमोर एकही बिगर गोमंतकीय उत्सुकतेने डोकावताना दिसणार नाही. मोसमात ही अळंबी एकदा तरी खायलाच हवीत नाहीतर गोमंतकीयांच्या मिजासीला एक प्रकारे न्यूनत्व येते.

निराकार सातेरीला (वारूळ) स्थानिकांनी देवी मानून तिला केळबाई, म्हामाई असे पूजनीय स्वरूप दिले आणि वारुळामधील वाळवीं मधला नरदीमक (ऑडेंटर्मस ऑबेसस) रवळू हा रवळनाथ बनला. देवराईमधून फोफावण्यास या दोन्हीना मुक्तद्वार होते. वाळवींना मारण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करणे ही गोवा-कोकणची संस्कृती कधीच नव्हती.

कीटकनाशके न वापरणाऱ्या संस्कृतीने शाश्वतपणे अळंबीचा वापर आपल्या आहारात शेकडो वर्षांपासून केला मात्र भोगपूर्ण अन्नाचा अतिरिक्त हव्यास बाळगणाऱ्या आधुनिक संस्कृतीने सातेर आणि रवळू या दोन्हींना धोका उत्पन्न करून अळंबीलाच धोक्याच्या काठावर नेऊन ठेवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT