pundlik krush  Dainik Gomantak
ब्लॉग

बनारस घराण्याचे घरंदाज तबलावादक पं. पुंडलिक कृष्ण भागवत

गोमंतकीयांना लाभणार बनारसी तबला एकलवादन ऐकण्याची संधी

Dainik Gomantak

बनारस घरण्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक पं. पुंडलिक कृष्ण भागवत यांच्या पारंपरिक, विशुद्ध घरंदाज तबलावादनाचा आस्वाद घेण्याची संधी गोमंतकीयांना इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी)तर्फे आयोजित मैफलीत लाभणार आहे. सोमवार 10 जुलै रोजी, संध्याकाळी 4 वा. पं. भागवत यांची ही तबला एकलवादनाची खास मैफल, आयएमबीच्या सभागृहात पार पडेल.

 पं. भागवत यांचा जन्म वाराणसी येथील शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा असलेल्या घराण्यात झाला. त्यांनी आपले वडील स्व. पं. कृष्ण विनायक भागवत तसेंच लक्ष्मीकांत नायक यांच्याकडून तबलावादनाचे अनेक वर्षे शिक्षण घेतले. त्यांनंतर बनारस घराण्याचे बुजुर्ग तबलावादक पं. ईश्वर लाल मिश्र यांचे शिष्यत्व त्यांना लाभले.

बनारस घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन रचना आत्मसात करण्याच्या ओढीने त्यांनी बनारस घराण्याचे अध्वर्यू पद्मविभूषण पं. किशन महाराज यांचे शिष्यत्वही त्यांनी पत्करले. आकाशवाणी महासंचालनालय- नवी दिल्लीचा टॉप ग्रेड आर्टिस्ट हा सन्मान तसेच 2014 मध्ये राज्यपालांच्या हस्ते उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त त्यांना झाला आहे.

अमेरिका, लंडन, स्वित्झर्लंड आदी 15 देशांत त्यांनी कार्यक्रमासाठी दौरे केले आहेत. शास्त्रीय गायनातही ते वाकब्‌गार असून त्यांना 2009 मध्ये  मॅजिक टेलंट साठी श्रीलंकेच्या सिंघे विद्यापीठाने गौरविले आहे. 10 जुलै रोजी होणाऱ्या त्यांच्या मैफलीत दत्तराज म्हाळशी त्यांना हार्मोनियमवर नगमा साथ देतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT