Floods Impact Dainik Gomantak
ब्लॉग

Floods Impact: म्हादईच्‍या पुरानंतर उदरनिर्वाहाचा प्रश्‍‍न उभा ठाकला

भागांतील हातावर पोट असलेली गरीब कुटुंबे पुरात बेघर झाली. हा पूर त्यांचे छत हिरावणारा, त्यांना आर्थिक संकटात नेणारा ठरला.

दैनिक गोमन्तक

पर्ये: सत्तरीत 23 जुलैला म्हादई नदीला (Mandovi River) महापूर (Floods) येऊन त्याचा फटका किनारी भागाला बसला. त्यातून घरातील वस्तू - उपकरणे वाहून जाणे, खराब होणे असे प्रकार घडले. शेती-बागायतींचे प्रचंड नुकसान झाली. तसेच अनेक भागांतील हातावर पोट असलेली गरीब कुटुंबे यात बेघर झाली. हा पूर त्यांचे छत हिरावणारा, त्यांना आर्थिक संकटात नेणारा ठरला. (Poor families become homeless in the floods of Mandovi River)

म्हादई नदी किनारी असलेल्या सोनाळ ते उसगाव खांडेपारपर्यंतच्‍या भागाला या पुराचा सर्वाधिक फटका बसला. त्यात किनारी भागातील अनेक घरे जमीनदोस्त झाली. पुरात जमीनदोस्त झालेली बहुतेक सर्व घरे ही मातीची घरे होती. यातील अनेक घरांमध्‍ये अत्‍यंत गरीब कुटुंबे राहायची. त्‍यांची घरे पुरात उद्‍ध्‍वस्‍त झाल्‍याने ती बेघर झाली आहेत.

या पुरात कुडशे येथे एक, वाळपई शहरातील २, शिवाजीनगर-खडकी येथे ५, कणकीरे येथे २, गांजे येथे ४, अडवई येथे एक, बोणकेवाडा-वांते येथे एक, उसगाव-तिराळ येथे दोन घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. तसेच इतर घरांचेही कमी-जास्‍त प्रमाणात नुकसान झाले. घर पूर्णपणे कोसळलेल्या बहुतेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे. त्यांच्या घरांमध्ये सरकारी नोकरदार सोडाच खासगी कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीलासुद्धा कुणी नाही. या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत त्‍यांचे कर्ते पुरुष अथवा कमावणारी व्यक्ती एखाद्या खासगी आस्थापनांत कंत्राटी कामगार किंवा रोजंदारीवर काम करणारे होते.

यातील बहुतेक कुटुंबे ही दलित व आदिवासी समाजातील आहेत. त्यांची घरेसुध्दा तिथल्या जमीनदारांच्या जमिनीत आहेत. त्‍यांचे हातावरचे पोट आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍यापुढे आता उदरनिर्वाहाचा प्रश्‍‍न उभा ठाकला आहे.

सरकारची दोन लाखांची मदत अपुरी

सरकारने पूरग्रस्‍तांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, ती रक्कम खूपच कमी आहे, असे मत वाळपईतील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र गावकर यांनी व्‍यक्‍त केले. ते म्हणाले, जी घरे कोसळली त्या ठिकाणी मातीची घरे उभारणे धोक्याचे आहे. कारण या भागात भविष्यात पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिरे-सिमेंटची घरे उभारावीत. सध्‍या वाळू, सिमेंट, चिरे यांच्‍या किमती तसेच मजुरांची मजुरी गगनाला भिडली आहे. अशातून दोन लाखांमध्ये घर उभारणे कितपत शक्य होईल? त्याचबरोबर त्यांचे घरातील साहित्‍यही वाहून गेले आहे. या सर्वांची किंमत पाहता दोन लाख खूपच कमी आहेत. काम करून पोट भरणे असेच अनेकांचे जीवन होते, तर त्यांच्याकडे बचत केलेले पैसे कुठे असणार? त्‍यांना आता कुणी कर्जही देणार नाही. त्यामुळे सरकारने त्यांना भरघोस आर्थिक मदत करून त्यांचा संसार उभा करावा, अशी मागणी त्‍यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Record: विश्वविक्रम! अभिषेक शर्माने रचला इतिहास, टी-20 मध्ये सर्वात जलद 1000 धावांचा टप्पा पार

सुपारी गँगस्टर तिला गोळी घालू शकतो! पूजा नाईकला सुरक्षा देण्याची काँग्रेसची मागणी; कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात मंत्र्याचा हात??

Saiyami Kher: 'आरोग्य चांगले नसेल, तर पैसा असून काहीच फायदा नसतो'! Ironman 70.3 स्पर्धेची सदिच्छादूत अभिनेत्री 'सैयामी'चे प्रतिपादन

"हांव जीव सोडपाक तयार", गोव्यातील 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला; नेमके घडले काय? Watch Video

Tamarind Tree: राम, सीता, लक्ष्मण वनवासात गेल्यावर प्रथम जिथे झोपडी बांधून राहिले असा, गुणधर्माने देवपण लाभलेला 'चिंच वृक्ष'

SCROLL FOR NEXT