Goa Board 12th Result Declared
Goa Board 12th Result Declared Dainik Gomantak
ब्लॉग

बारावीनंतर शिक्षणाच्या संधी...

दैनिक गोमन्तक

संजय घुग्रेटकर

बारावीनंतर पुढे काय? हा प्रश्‍न विद्यार्थ्यांबरोबरच पालकांना सोडविणे कठीण जाते. कारण पालकांच्याही अपेक्षा अनेक असतात, शिवाय त्या मोठ्या असतात. परंतु जे पालक सुरवातीपासून विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार मार्ग निवडतात, प्रयत्न करतात. त्यांना बारावीनंतर शाखा निवडताना कठीण जात नाही.

(Opportunities for education after 12th standard)

बारावीनंतर फक्त इंजिनियर, वैद्यकीय शिक्षण हेच महत्त्वाचे असे काही पालकांचे मत असते. त्यामुळे फक्त या दोनच शाखांचा विचार केला जातो. परंतु याशिवाय इतर अनेक शाखा निर्माण झालेल्या आहेत. नवे शोध, नव्या गरजानुसार करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे बारावीनंतर इतरही शाखांतून शिक्षण घेणे गरजेचे आहे.

बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. बारावीनंतर घेतलेले अभ्यासक्रम भविष्यात विद्यार्थ्याच्या कारकिर्दीचा पाया रचतात. म्हणूनच, विद्यार्थ्यांना करिअरच्या महत्त्वपूर्ण पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे. बारावीनंतर विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतले करिअरचे अनेक पर्याय आहेत. त्याचा विचार विद्यार्थी पालकांनी करायला हरकत नाही. गोव्याबरोबरच शेजारील कर्नाटक, महाराष्ट्रात विविध ज्ञान शाखेत पदवी घेणे शक्य आहे.

गोव्यातही अलीकडे अनेक कोर्सेसची सुविधा निर्माण झालेली आहे. उत्तम शिक्षणाची सोय आहे. परंतु काही वेगळ्या अभ्यासक्रमासाठी गोव्याबाहेर जाण्याची तयारीही ठेवली पाहिजे.

विज्ञान कोर्स पर्याय

  • अभियांत्रिकी (बीटेक / बीई)

  • एरोनॉटिकल अभियांत्रिकी

  • ऑटोमोबाईल अभियांत्रिकी

  • सिव्हील अभियांत्रिकी

  • इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन ` अभियांत्रिकी

  • औद्योगिक अभियांत्रिकी

  • माहिती तंत्रज्ञान

  • केमिकल अभियांत्रिकी

  • खाण अभियांत्रिकी

  • इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी

  • सागरी अभियंता आयएनजी

  • प्रिंट आणि माध्यम तंत्रज्ञान

  • विद्युत अभियांत्रिकी

  • डेअरी तंत्रज्ञान

  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग

  • आर्किटेक्चर

  • कॉम्प्युटर अॅप्लिकेशन

  • मर्चंट नेव्ही

  • नॉटिकल टेक्नॉलॉजी मधील बी.एससी

  • नॅव्हल आर्किटेक्चर अँड शिपबिल्डिंग मधील बी.टेक

बीएससी - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, खगोलशास्त्र, फॉरेन्सिक विज्ञान, भूविज्ञान, कृषी, माहिती तंत्रज्ञान, सांख्यिकी, औद्योगिक रसायनशास्त्र, फॅशन तंत्रज्ञान.

एव्हिएशन विज्ञान मधील बीएससी

  • संरक्षण

  • बिझनेस अभ्यासक्रम

  • बी.कॉम

  • हॉटेल मॅनेजमेंटमध्ये

  • रिटेल मॅनेजमेंटमध्ये बीए

  • हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीएससी

  • फॅशन मर्चेंडायझिंग अँड मार्केटींग मधील बीए

  • ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट मध्ये बीए

  • बॅचलर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स.

यापैकी कोणत्याही कोर्ससंदर्भात बारावी नंतरचे कोर्सचा करिअरविषयक मासिक, इंटरनेटवर शोध घेतला, तर अनेक शिक्षण संस्थांची माहिती मिळते. पण त्यापैकी योग्य त्या संस्थेची निवड करणे, त्या संस्थेची परीक्षा केव्हा, कधी, कोठे आहे ते पहाणे गरजेचे आहे. त्या परीक्षेचा नेमका अभ्यास केला, ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच तेथे प्रवेश मिळतो. वेगवेगळ्या संस्थेचा कोर्सनुसार प्रवेश फी निश्‍चित केलेली असते. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार विचार करायला हरकत नाही. शिवाय शैक्षणिक कर्जाचाही विचार करायला हवा. सरकारी शिष्यवृत्तीही मिळू शकते. पण त्यासंदर्भात माहिती घेणे आणि ती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते.

गोवा सरकारने चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत, त्याचा लाभ घ्यायला हवा. आपले जिद्द, परिश्रमाने निश्‍चिपणे शिक्षण पूर्ण होऊ शकते. त्यासाठी विद्यार्थी व पालकांची इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी असणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT