Painting Dainik Gomantak
ब्लॉग

Water Color: पेंटिंग ऑफ द वीक

नव्या ग्राहकांमध्येही 'कॅफे प्रशांत' अस्सल गोमंतकीय भाजी-पावासाठी ओळखले जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

चिराग कामत

'Water Color Artists Association of Goa' जुन्या म्हापसा शहराची जी चिन्हे आज अस्तित्वात आहेत, त्यात, विस्मृतीत गेलेल्या 'अलंकार' सिनेमागृहाजवळचे 'कॅफे प्रशांत' हे ठिकाण अजूनही आपला आब राखून आहे.

एके काळी अनेक युवा मनाची स्पंदने या कॅफेमधील भाजी-पावचा आस्वाद घेत मनसोक्तपणे प्रकट झालेली आहेत. अजूनही तो काळ आठवून या कॅफेत पाय टाकणारी मंडळी आहेत.

नव्या ग्राहकांमध्येही 'कॅफे प्रशांत' अस्सल गोमंतकीय भाजी-पावासाठी ओळखले जाते. 'वॉटर कलर आर्टिस्ट असोसिएशन ऑफ गोवा'च्या चिराग कामत याने हा कॅफे आपल्या जलरंगांमधून परिणामकपणे रंगवला आहे.

जुन्या म्हापसामधील काही शेवटच्या शिलेदारांपैकी असलेले हे ठिकाण, चिराग याने अशा कोनातून रंगवले आहे की त्यामुळे चित्राचा भाग बनलेले कॅफेचे कौलारू छप्पर, पत्र्यांची शेड यातून या कॅफेच्या इमारतीची एकेकाळची डौलदार संपन्नता लक्षात येते.

पार्श्वभागी असलेल्या उंच आधुनिक इमारतीच्या भिंतीसमोर आपले अंग सावरत उभी असलेली कॅफेची ही ऐतिहासिक इमारत, समोरच्या कलणाऱ्या विजेच्या खांबासोबत कोणता संवाद साधत असेल? त्याच्या कलण्यात ती स्वतःचे भविष्यही पहात असेल काय?

वॉटर कलर असोसिएशनच्या 9 सदस्यांनी, गेल्या रविवारी म्हापसा शहरात आयोजित केल्या गेलेल्या बाह्यस्थळ चित्रकला सत्रात भाग घेतला.

Chirag Kamat

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT