Theater: धाडिला राम तिने का वनी...

गावच्या हौशी नाट्य कलाकारांनी नाट्य परंपरा अजूनही जपून ठेवली आहे.
Drama
Drama Dainik Gomantak
Published on
Updated on

Active Participation Of Women In Theater कधी-कधी असं होतं की, आपणाला एखादी गोष्ट अतिशय आवडली की ती दुसऱ्यांच्या समोर मांडावी असे वाटत राहते. असंच काही तरी माझ्या मनात हे नाटक पाहिल्यानंतर आले.

मी काही मोठा नाटककार किंवा नाट्यसमीक्षक नाही. गावात असताना हौशी नाट्य कलाकार म्हणून आणि नाटकांप्रती असलेली आवड एवढंच काय तो माझा नाटकाशी संबंध.

पण माझ्या गावात महिलांनी सादर केलेले ‘संगीत धाडिला राम तिने का वनी’ हे नाटक पाहून राहावलं नाही आणि लिहायला बसलो.

वझरी हा पेडणे तालुक्यातला, नदीकाठी वसलेला निसर्गसंपन्न असा गाव, ज्याला महादेव, सातेरी, राष्ट्रोळी, वडावयलो ह्या देव-देवतांचा कृपाशीर्वाद लाभलेला आहे आणि त्यांच्याच कौलामुळे महाशिवरात्री, वर्धापनदिन अशा उत्सवांच्या निमित्ताने तिथे नाटकं सादर केली जातात.

गावच्या हौशी नाट्य कलाकारांनी ही परंपरा अजूनही जपून ठेवली आहे. दिनांक 12 एप्रिलला, वर्धापन दिनाच्या निमित्तानं गावी जाणं झालं आणि हे सुदैवाने नाटक पाहणं झालं.

‘श्री महादेव सातेरी महिला नाट्यमंडळ, वझरी- मडकईवाडा’ या संस्थेने हे नाटक सादर केले. नाटकाचे सादरीकरण अतिशय उत्तम झाले. एवढ्या मोठ्या नाटकाचं धनुष्य पेलणं हे सोपं काम नव्हतं पण गावच्या मुलींनी ते करून दाखवलं.

ह्या निमित्ताने अनेकजणी पहिल्यांदाच नाटकात भूमिका करत होत्या. उदाहरणार्थ- रामाची भूमिका साकारणारी श्रृती नाईक, जी पहिल्यांदाच नाटकात अभिनय करत होती पण स्पष्ट उच्चार, भाषेवरचे प्रभुत्व आणि अवघड शब्द असलेली ती गाणी लीलया गाऊन तिने बाजी मारली.

Drama
Sasashti electrical : सोनसोडो प्रकल्पात विद्युत उपकरणांची वानवा

नाटकाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने, ‘हे शिवशंकर भवभयहारक’ ह्या नांदीने झाली. नाटकाची नांदीच बंदिस्त, नेटकी आणि सुरेल होती.

नाटकाची सुरवात अवदालिका, सीता आणि दासीच्या संभाषणाने होते आणि त्या प्रसंगातले पहिलं गाणं, ‘लेवू कशी वल्कला’ हे सीतेची भूमिका करणारी कु. लालन अ. परब हिने जबरदस्त गाऊन प्रेक्षकांची वाहव्वा मिळविली.

राम, भरत आणि कैकेयी यांच्या भूमिका करणाऱ्या श्रृती नाईक, अन्विका सावंत व शमिका नाईक यांना संगीताची जाण व ज्ञान नव्हते, पण त्यांनीसुद्धा त्यांनी आपली गाणी सुरात, लयीत आणि तालात सादर केली.

कुणाच्याच चेहऱ्यावर ना भीती होती, न कुठल्या तऱ्हेचे दडपण! त्यांच्यात फक्त आत्मविश्वास दिसत होता. त्यांच्या आत्मविश्वासाचे श्रेय संगीत दिग्दर्शक चंदन शेटये यांनाच द्यावे लागेल. नाटकाचं दिग्दर्शन अमर कोनाडकर ह्यांनी केले होते.

Drama
Curchorem Food Court : कुडचडे फूडकोर्ट बनला ‘पांढरा हत्ती’

दिग्दर्शक या नात्याने त्यांनी सर्वांना एका सुरेख सूत्रात बांधून ठेवले. त्याव्यतिरिक्त सनम सावळ (लक्ष्मण), स्वरा शेटये (शत्रुघ्न), रंजना परब (दशरथ), संजिता नाईक (सुमंत), सौ. मंगल नाईक (वसिष्ठ), दिक्षा परब (देवकुलीन), लिया फर्नांडिस (सारथी) आणि विनीता परब (दासी) यांनीदेखील आपल्या भूमिका उत्कृष्टपणे साकारल्या.

पुरुषांच्या भूमिका साकारणाऱ्या महिलांचे संवाद इतके ओजस्वी होते की ऐकताना वाटत नव्हते की एखादी स्त्री ती भूमिका सादर करते आहे म्हणून. आज आपण महिला सशक्तीकरणाचे अनेक कार्यक्रम राबवितो.

अनेकदा असा विचार करतो की शहरांतल्या स्त्रियांना अनेक सुविधा उपलब्ध असतात त्यामुळे त्या चमकू शकतात. गावातील स्त्रियांनीसुध्दा अशा सकारात्मक प्रकारे जर आपली प्रतिभा आणि शक्ती दाखविली तर स्वत:चा ठसा उमटविण्यास त्यांना कोणीही रोखू शकणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com