चैतन्यमयी मैफल Dainik Gomantak
ब्लॉग

चैतन्यमयी मैफल

“ही मैफल आयोजित करण्यामागे आणखीन एक कारण हे होते की या कोरोनाकाळाने निर्माण केलेल्या लोकांमधल्या आणि विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांमधल्या स्तब्धतेला तडा देणे ! चैतन्य देणे !

दैनिक गोमन्तक

गोवा विद्यापिठाच्या नाना शिरगांवकर आसनाला 10 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने कर्नाटकी आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची मैफल इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा येथे रंगली. संगीत क्षेत्रात प्रसिध्द असलेल्या अक्काराथा भगिनींच्या या मैफलीत हिंदुस्थानी आणि कर्नाटकी अशा शैलीत आपल्या व्हायोलिन वादनाने त्यांनी सर्वांची मने जिंकली.

त्यांना के साई गिरीधर यांनी मृदंगावार साथ दिली तर घट्टमची साथ होती. के. कार्थीक यांची. अक्करायी भगिनी या आपल्या व्हायोलीन वादनाप्रमाणेच आपल्या गायकीसाठीही ओळखल्या जातात. आपल्या मैफलीमधून त्यांनी हजारो संगीत रसिकांची मने जिंकलेली आहेत. जागतिक स्तरावर ओळख मिळविलेल्या या भगिनींनी भारतीय संगीताबरोबरच संगीताच्या जांझ, पाश्‍चिमात्य शास्त्रीय अशा इतर शैलीबरोबरही सहयोग साधलेला आहे. देशभरातले अनेक सन्मान त्यांना लाभलेले आहेत.

“ही मैफल आयोजित करण्यामागे आणखीन एक कारण हे होते की या कोरोनाकाळाने निर्माण केलेल्या लोकांमधल्या आणि विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांमधल्या स्तब्धतेला तडा देणे ! चैतन्य देणे ! संगीताला भाषा नसते आणि सारे जण संगीताचा आस्वाद निरपेक्षपणे होऊ शकतात.” गाेवा विद्यापिठाच्या व्हिजिटींग रिसर्च प्रोफेसर प्रोग्रामच्या संचालिका प्रा. सविता केरकर यांचे वरील वाक्य सार्थ ठरविणारी अशीच अक्कराय भगिनींची मैफल होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Budh Chandra Yuti: 2026 च्या सुरुवातीलाच 'बुध-चंद्र' युतीचा धमाका! धनु राशीत राजकुमार आणि मनाचा कारक एकत्र; 'या' 3 राशींच्या लोकांचे पालटणार नशीब

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

Goa Nightclub Fire: 'बर्च' दुर्घटना, पाचही संशयित 14 दिवस न्यायालयीन कोठडीत!

IND VS SA: धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द, चाहत्याचं भंगलं स्वप्न; BCCIवर संताप

SCROLL FOR NEXT