Monsoon Insect Dainik Gomantak
ब्लॉग

इवल्या पावसाळी जीवांचे विराट विश्व

गोमन्तक डिजिटल टीम

एरवी अंग चोरून मातीच्या, झाडांच्या, वाळलेल्या पानांच्या, नदीकाठी दलदलीच्या आत अंग चोरून राहिलेल्या जीवांना पाऊस कुठला धीर देतो कळत नाही पण ते सारेच भिजलेल्या सृष्टीत नव्याने जन्म घेतल्यासारखे येऊन आपापल्या पाळण्यात झुलायला लागतात. कुणी फुल, कुणी कीटक, कुणी सुरवंट, कुणी फुलपाखरू, कुणी भूछत्री अशी अठरा लक्ष योनीमधली एक योनी स्वीकारून माती, गवत, वृक्ष, पाणी यात निवास करत, आपल्या इवल्याशा मोसमी आयुष्याने ते निसर्गाला रंगीबिरंगी करत राहतात.

आपल्यापैकी साऱ्यांचेच त्यांच्याकडे लक्ष जाते असे नाही. किंबहुना चालता-चालता त्यांच्यापैकी एखादा जीव आपल्या हातावर जरी येऊन बसला तरी त्‍याला झटकण्याकडेच आपला कल असेल. पण अशा जीवांचे सौंदर्य फार जवळून न्याहाळणारीही काही मंडळी आहेत. त्यांच्यापैकी एक आहेत, म्हापसा येथील राजेश मिशाळ.

गेली अनेक वर्षे ते आपल्या व्यवसायातून वेळ काढून या सूक्ष्म जीव-विश्‍वाला आपल्या कॅमेऱ्यातून टिपत आलेले आहेत. त्यांनी टिपलेल्या काही जीवांचे फोटो पाहिल्यास हे सौंदर्य आपल्या नजरेतून कसे निसटले याचे आश्‍चर्य अनेकांना वाटू शकते.

त्यांनी पावसाळी मोसमात टिपलेली ही जीवसृष्टी पाहता, पहिल्या प्रथम ‘पाऊस’ या ऋतूचे कौतुक मनात भरून येते. पावसामध्ये कड्यां-कपारीमधले भव्य धबधबे जसे पुन्हा जीवन धारण करतात तसेच पाणी आकंठ पिवून हिरव्या झालेल्या पात्यामागेही एखादा सूक्ष्म-सुंदर जीव जीवन धारण करत असतो.

राजेश मिशाळ यांनी एकाग्रतेने हे विश्‍व ढुंढाळले आहे. त्यांच्या फेसबुकवर अकाऊंटवर गेलात तर त्यांच्या कामातील सातत्य आपल्या लक्षात येऊ शकेल. सूक्ष्म जीवांच्या प्रचंड विश्‍वाचा एक इवलासा भाग तिथे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

Goa Today's News Live: म्हापशात भेसळयुक्त 200 किलो बडीशेप जप्त

Pramod Sawant: दक्षिणेतील काही राज्य हिंदी समजून देखील घेण्याचा प्रयत्न करत नाहीत; गोवा मुख्यमंत्री

एक देश-एक निवडणूक! प्रत्यक्षात येण्याची वाट कमालीची खडतर; संपादकीय

SCROLL FOR NEXT