श्रीपादच्या ‘व्हेअर डू वी कम फ्रॉम, व्हॉट आर वी, व्हेर आर वी गोईंग..’ ह्या, रंगीत पेन्सिली, ग्रॅफाईट पेन्सिल आणि जलरंग वापरून तयार केलेल्या चित्राला अखिल भारतीय चित्रकला स्पर्धेत द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले होते. हैदराबाद येथील प्रदर्शनात चित्र मांडले गेले होते.

 

Dainik Gomantak 

ब्लॉग

लघु चित्रांच्या शैलीतून आधुनिक गोवा

गोव्यावर (Goa) दीर्घकाळ राज्य केलेल्या पोर्तुगीज (Portugal) राजवटीच्या प्रभावामुळे माझ्या चित्रांमधल्या प्रतिमांना एक विशिष्ट असे वळण लाभत असावे.

दैनिक गोमन्तक

'स्पेसेस अ‍ॅण्ड डायमेन्शन्स’ या चित्रप्रदर्शनात (Exhibition) सहभागी असलेला दुसरा चित्रकार आहे, श्रीपाद गुरव. श्रीपाद स्वतःच्या चित्रांबद्दल बोलताना म्हणतो, “मला भारतीय लघु-चित्रे (मिनिएचर) मुघल, पहाडी, बुंदी इत्यादी खूप आवडतात. ‘स्त्री’ (Women) नेहमीच माझ्या चित्रांमधून प्रमुख पात्र बनून अवतरते. आपल्या प्राचीन शिल्पांमधून आम्हाला ‘यक्षिणीं’चा संदर्भ मिळतो. माझ्या चित्रांमधून ह्या यक्षिणी, अत्युत्तम आणि आधुनिक पेहराव आणि प्रचलित फॅशनचा (Fashion) अंगीकार करून प्रकट होतात.”

“प्रत्येक व्यक्तीचे जीवन आणि जीवनशैली ही संस्कृती(Culture) , धर्म, वर्ग, सवयी आणि सत्व यांच्या योगाने ठरते. गोव्यावर (Goa) दीर्घकाळ राज्य केलेल्या पोर्तुगीज (Portugal) राजवटीच्या प्रभावामुळे माझ्या चित्रांमधल्या प्रतिमांना एक विशिष्ट असे वळण लाभत असावे. तसा अन्वयार्थ आपण नक्कीच काढू शकतो. मला जाणवणाऱ्या या साऱ्या गोष्टी मी विडंबनात्मक पद्धतीने मांडतो. या साऱ्या गोष्टी कथनात्मक शैलीने सादर करताना त्यात मी नाट्यात्मकता आणण्याचा प्रयत्न करतो. प्राण्यांची रूपके वापरून, माझ्या स्वतःच्या संस्कृतीची सौम्य खिल्ली उडवून मी माझीच फसवणूक करून घेतो आणि एक प्रकारची मौज अनुभवतो.

वैयक्तिकरित्या हा माझा ‘नोस्ताल्जिक’ प्रवास आहे, ज्यात गूढता आणि द्वंद्व या गोष्टी एकमेकात मिसळतात आणि आपसातला संवाद पूर्ण करतात. गोमंतकीय व्यक्तिरेखां, स्थळे यांची आता शहरीकरणाशी होणारी जोडणी, माझ्या चित्रांमधून माझी वैयक्तिक मांडणी बनून, प्रतीकात्मकरीत्या माझ्या चित्रांमधून झळकते. चित्रकलेमधले ‘इचिंग’ (प्रिंट मेकिंग) हे माध्यम माझ्या अभिव्यक्तीसाठी मला अत्यंत प्रशस्त वाटते. शिस्त आणि अचूकता या दोन गुणांचा अंतर्भाव असलेली ही चित्रकलेची प्रक्रिया रहस्यमय आणि जादूमय आहे.”

2008 साली एका प्रदर्शनात श्रीपाद गुरवची चौदा चित्रे, मुंबईतल्या (Mumbai) ख्यातनाम ‘जहांगीर आर्ट गॅलरी’मध्ये मांडली गेली होती. श्रीपादसाठी सन्मानाची गोष्ट म्हणजे ही सारी चौदा चित्रे (Pictures) त्या प्रदर्शनातच विकली गेली. त्यानंतर श्रीपादच्या चित्रांची अनेक प्रदर्शने मुंबई आणि दिल्लीत (Delhi) आयोजित झाली.

केरी, (पेडणे)सारख्या लहानशा गावात आपले दहावीपर्यंतचे आणि नंतर मांद्रे या गावात बारावीचे शिक्षण पूर्ण केलेल्या श्रीपादने ‘गोवा कॉलेज ऑफ फाईन आर्ट’मधून( Goa College of Fine Arts) चित्रकलेची पदवी घेतली. त्यानंतर हैदराबाद इथल्या ‘एस. एन. स्कूल ऑफ आर्ट’मधून आपला पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना, श्रीपादने ‘प्रिंट मेकिंग’मध्ये विशेष प्राविण्यासह पहिले स्थान पटकावले. ‘स्पेसेस अ‍ॅण्ड डायमेन्शन्स’ हे प्रदर्शन कांपाल इथल्या ‘सूर्यकिरण हेरिटेज हॉटेल’ मध्ये सध्या चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT