Cemetery Dainik Gomantak
ब्लॉग

Christian Cemetery: मडगावातील ख्रिस्ती स्मशानभूमीचा इतिहास

जुनी स्मशानभूमी जिथे होती तिथे आज ‘होली स्पिरिट’ ही संस्था उभी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वाल्मिकी फालेरो

मडगाव येथील माजी महाविद्यालय आणि रुग्णालयाची जागा त्या (१७व्या) शतकाच्या मध्यापर्यंत बाहेरील स्मशानभूमी (जुनी स्मशानभूमी) बनली. त्यात दोन स्मारके बांधण्यात आली. यांपैकी एक स्मारक लोअर बोर्डाचे गावकर ज्योकिम फिलिप दा पिएदाद सोरेस (१८०६-५५) यांच्या स्मरणार्थ लोकसहभागातून बांधण्यात आले.

सोरेस यांनी १८४२मध्ये स्थापन झालेल्या गोव्यातील पहिला संविधान समर्थक राजकीय पक्ष, पटुलेयाचे नेतृत्व केले. (गमतीची गोष्ट म्हणजे, पॅटुलेया हे पोर्तुगालच्या अल्पायुषी गृहयुद्धाचे नाव होते जे ’मारिया दा फॉन्टेच्या क्रांती’मुळे मध्यंतरी महिलांनी शस्त्रे हाती घेतली होती.

एप्रिल १८४६ मध्ये सरकारचे विकेंद्रीकरण, चर्चमध्ये दफन करण्यास मनाई आणि जमीन-कराचे पुनर्मूल्यांकन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्या गृहयुद्धाचे प्रतिबिंब त्यावेळच्या गोव्याच्या राजकारणावरही पडले.)

स्मशानभूमी

गोव्यातील ख्रिश्चनांना चर्चच्या जमिनीत दफन केले जात असे. थडगी बांधण्याची आणि चर्चची जागा व्यापण्याची प्रथा कोणीतरी नंतर सुरू केली असावी. वर्ष १५६८साली गोवा आर्कडायोसीसच्या नियमावलीद्वारे चर्चमधील खाजगी थडग्यांना मनाई करण्यात आली.

अध्याय सहामध्ये दफन आणि थडग्यांची विक्री करण्यास मनाई आहे. तथापि, रँक आणि पदवी, संरक्षक आणि याजक यांच्या खानदानी व्यक्तींना खाजगी दफन आणि थडग्यांच्या नियमांपासून सूट देण्यात आली होती.

अध्याय दहाअन्वये बहिष्कृत लोकांचे दफन करण्यावर बंदी घातली (ज्यांनी चर्चशी संपर्क साधला नाही किंवा चर्चच्या विश्वासास अपात्र ठरले) शीर्षक क्रमांक २७अन्वये जाणूनबुजून बहिष्कृत व्यक्तींना आणि इतर प्रतिबंधित व्यक्तींना दफनभूमीच्या पवित्र भागात पुरले, अशा याजकांना बहिष्कृत करून त्यांनाही चर्चच्या भूमीत दफन करण्यास मनाई करण्यात आली.

ज्यांनी आधीच्या एका वर्षात कबुली दिली नाही किंवा कम्युनियन प्राप्त केले नाही त्यांनाही अशाच प्रकारे दफनासाठी परवानगी नाकारण्यात आली.

चर्चमध्ये स्थानानुसार थडग्यांचे वर्गीकरण दोन किंवा तीन भागांत करण्यात आले होते. मुख्य वेदीच्या सर्वांत जवळ असलेल्या आणि सर्वांत जास्त किंमत असलेली उच्च श्रेणीतील थडगी होत्या.

एखाद्याने आपली संपत्ती शवपेटीमध्ये ठेवली नसेल परंतु ती शवपेटी चर्चच्या मजल्यावर कोठे गेली हे एखाद्याच्या संपत्तीवर अवलंबून असते. गरीब - आणि कंजूष असलेल्यांना मुख्य वेदीपासून सर्वात दूर असलेल्या स्वस्त थडग्यांत दफन करण्यात आले.

डॉ. जुझे परेरा यांच्या म्हणण्यानुसार, चर्चच्या जमिनीतून बाहेर पडणाऱ्या प्रेतांच्या दुर्गंधीला, उग्र वास असलेल्यादालचिनी आणि चंपकच्या झाडांची लागवड करून दूर करण्याचा प्रयत्न खास करून फेस्ताच्या दिवशी केला जात असे.

वेल्हा गोव्यातील कॉन्व्हेंट ऑफ सांता मोनिकासारख्या ठिकाणांहून आणलेले गुलाबपाण्यासारखे सुगंधी द्रव्यदेखील वारंवार वापरले जात असे.

‘चर्चच्या भिंती आणि छत पानांनी सुशोभित केले होते, बांबूच्या मचाणी बांधून वर छत आच्छादित केले जात असे. रेशमी कापडांनी भिंती झाकल्या जात असत. जवळपास ३० वेद्यांमध्ये मेणबत्त्या आणि फुलांचा भरणा होता (यासाठी वारंवार तिजोरी खाली केली जात असे). वेदीसाठी निवडलेली फुले सहसा मोगऱ्याची व गुलाबाची असत. वेदी आणि निवासमंडपात दमस्क टांगल्या जात.’

१७७८ ते १८३६ पर्यंत, आर्कडायोसिसने चर्चमध्ये पार्थिव देह दफन करण्याची अस्वच्छ प्रथा थांबवण्यासाठी आणि त्याऐवजी चर्चच्या आवारात स्मशानभूमी बांधण्यासाठी वारंवार निर्देश जारी केले. असा पहिला आदेश १८ जुलै १७७८ रोजी जारी करण्यात आला, त्यानंतर ३ डिसेंबर १७७८ रोजी दुसरा आदेश जारी करण्यात आला.

गव्हर्नर फ्रेडेरिको गिल्हेर्म डी सौसा होल्स्टीन (१७७९-८६) यांनी सुचवले की ख्रिश्चनांना चर्चला लागून कुंपणाच्या उंच भिंतींनी वेढलेल्या स्मशानभूमीत दफन करावे. गोव्यातील काही मंडळींनी आर्चबिशपच्या आदेशाची अंमलबजावणी केली किंवा गव्हर्नरांच्या सल्ल्याकडे लक्ष दिले.

शेवटी, १४ जानेवारी १८०१च्या आदेशाने चर्चमध्ये दफन करण्यास बंदी घालण्यात आली. पण, त्याचाही फारसा उपयोग झाला नाही, हे उघड आहे.

१२ जुलै १८०२च्या आर्चबिशपच्या फर्मानामध्ये चर्चला गावकरांच्या खर्चाने सहा महिन्यांच्या आत बाह्य स्मशानभूमी बांधण्याचा आणि जर गावकरांकडे आवश्यक निधी नसेल तर स्थानिक चर्चच्या खर्चाने स्मशानभूमी बांधावी, असा आदेश देण्यात आला. २८ सप्टेंबर १८०४च्या परिपत्रकाद्वारे, आर्चबिशपने स्मशानभूमी बांधण्याची जबाबदारी व्हाइसरॉयवर टाकली.

सर्व आदेश असूनही चर्चच्या आवारात पार्थिव देह दफन करण्याची प्रदीर्घ परंपरा चालूच राहिली. त्यानंतर पोर्तुगालने २० सप्टेंबर १८३३च्या आदेशात हस्तक्षेप केला व चर्च आणि कॉन्व्हेंटमध्ये दफन करणे बेकायदेशीर ठरवले.

२१ सप्टेंबर १८३५च्या शाही हुकुमानुसार, पोर्तुगीज राजवटीत सर्व परगण्यांना त्यांची स्वतःची स्मशानभूमी बांधण्याचे आदेश देण्यात आले. १८४०मध्ये चर्चच्या बाहेर स्मशानभूमी बांधण्याचे निर्देश सर्व चर्चेसना देण्यात आले. १५६४/६५ मध्ये चर्च पहिल्यांदा बांधल्यानंतर मडगावमध्ये दफन केल्याची नोंद नाही.

स्थानिक ख्रिश्चनांना चर्चमध्ये प्रथेनुसार पुरण्यात आले होते, एवढीच माहिती उपलब्ध आहे. चर्चची पुनर्बांधणी एकूण पाचवेळा झाली. पहिल्या दोन खेपेस एके ठिकाणी झाली, तर पुढील तीनदा चर्च इमारतीची पुनर्बांधणी पूर्वेकडे झाली.

१७व्या शतकाच्या मध्यापर्यंत पार्थिव देह, विद्यमान चर्चच्या संरचनेत आणि चांगल्या हवामानात, चर्चच्या मागील अंगणातील एका खुल्या स्मशानभूमीत पुरण्यात आले, जिथे कॉलेजिओ आणि हॉस्पिटल एकेकाळी उभे होते.

नंतर दक्षिणेकडील बॅरेटो घरांच्या दिशेने, कमानदार प्रवेशद्वारासह उंच भिंतीचे कुंपण असलेली बंदिस्त स्मशानभूमी निर्माण करण्यात आली. २०व्या शतकातील नोंदींमध्ये स्मशानभूमी निर्मितीस एक शतकाहून अधिक काळ लोटल्यानंतरही याला जुनी स्मशानभूमी म्हणून संबोधले गेले. जुनी स्मशानभूमी जिथे होती तिथे आज ‘होली स्पिरिट’ ही संस्था उभी आहे.

निवासी चौकाच्या मध्यभागी मृतदेह दफन केल्यामुळे १७८२-८६ मध्ये महामारीचा उद्रेक झाला. ब्रिगेडियर यांनी केलेल्या उपाययोजनेअंतर्गत पोर्तुगीज लष्करी डॉक्टर जनरल हेन्रिक कार्लोस हेन्रिक्स यांना या समस्येचे निराकरण करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते.

त्यांनी उघडे खड्डे, नाले आणि विहिरींची दुरुस्ती केली. पण, हा प्रयत्न अयशस्वी झाला. गावकऱ्यांचा निधी वाया गेला आणि मृत्यूही ओढवले. मुरमुटी, कोंब, माडेल, मालभाट, फातोर्डा आणि अन्य ठिकाणच्या रहिवाशांनी आपली घरे सोडण्यास सुरुवात केली.

‘कपेलामोदी’(कपेलच्या मध्ये) स्मशानभूमी सध्याची मडगाव स्मशानभूमी आहे. कपेल आणि छताचा भाग १८०४मध्ये जोडण्यात आला. १९१८मध्ये स्मशानभूमी सध्याच्या आकार आहे, तेवढी वाढविण्यात आली. स्मशानभूमीत इटालियन संगमरवर बसवलेली अनेक कलात्मक थडगी आहेत.

पैशांव परेरा कुटुंबाने (चर्च स्क्वेअरमधील क्रमांक १०) काही थडगी उभारण्याचे काम, कंत्राट दिले. थडग्यांचे स्थलांतर करण्यात आले आणि नवीन स्मशानभूमीच्या भिंतींवर चर्चमधील जुने फलक चिकटवले गेले.

चर्चमध्ये सध्या अस्तित्वात असलेला एकमेव फलक, गोव्याच्या प्रीफेक्टच्या विधवेचा, बर्नार्डो पेरेस दा सिल्वा यांचा आहे. तो फलक बराच नंतर म्हणजे १८६० मध्ये निश्चित करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT